बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमधील झिरो फिगरचा ट्रेंड मोडीत काढणारी प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन सध्या चित्रपटांपासून दूर आहे. आपल्या उत्तम अभिनयाने विद्या बालनने चाहत्यांच्या मनामध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

सुंदरता म्हणजे फक्त स्लीम फिगर असणे एवढेच नाही तर तुमच्यामध्ये कोणकोणते कलागुण आहेत हे महत्वाचे असते हे विद्या बालनने दाखवून दिले. सध्या विद्या बालनने बॉलीवूडमध्ये आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.

विशेष म्हणजे अभिनेत्री विद्या बालन कधीच ग्लॅ’म’रस फो'टोशूट वा बो’ल्ड फोटोशूट करून चर्चेमध्ये राहत नाही. यामुळे तिच्या एका चाहत्याने तिला असाच एक प्रश्न विचारला. चाहत्याने विद्या बालनला विचारले कि तू हॉ’ट फोटोशूट का करत नाही? यावर उत्तर देताना विद्या बालनने एक चकित करणारे उत्तर दिले.

नुकतेच विद्या बालनने इंस्टाग्रामवर आस्क मी एनिथिंगचा एक सेशन ठेवला होता. यादरम्यान तिला चाहत्यांची अनेक प्रश्न विचारले. यावेळी एका चाहत्याने तिला विचारले कि तू हॉट फोटोशूट का करत नाहीस यावर उत्तर देताना विद्या म्हणाली कि सध्या उन्हाळा सुरु आहे आणि या दिवसांमध्ये मी फोटोशूट करते. मग झाले ना हॉ’ट फोटोशूट. तिचे हे उत्तर ऐकून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरु झाला. विद्या बालनने भन्नाट उत्तर देऊन युजरची बोलतीच बंद केली.

दरम्यान अभिनेत्री विद्या बालन लवकरच आपल्याला तिच्या आगामी चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. या चित्रपटामध्ये तिच्यासोबत अभिनेत्री शेफाली शाह देखील पाहायला मिळणार आहे. अभिनेत्री विद्या बालनने 'द डर्टी पिक्चर', 'परिणीता', 'लगे रहो मुन्नाभाई', 'भुलभुलैय्या', 'कहानी' सारख्या चित्रपटांमधून आपल्या अभिनयाचे कौशल्य दाखवून दिले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने