कुंवारी आपने छोड़ा नहीं, श्रीमती किसी ने बनाया नहीं' हा डायलॉग कोणत्या चित्रपटामधील आहे हे सांगणे फारसे अवघड नाही. 'गंगूबाई काठियावाडी' चित्रपटामध्ये चित्रपटामध्ये काम करण्यासाठी म्हणून आलेल्या गंगाला आयुष्यामध्ये काय काय सोसावे लागले हे दाखवण्यात आले आहे.

'गंगूबाई काठियावाडी' चित्रपटामध्ये बॉलीवूड अभिनेत्री आलीया भट्टने गंगुबाईची भूमिका साकारली आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली आहे. गंगुबाईची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री आलीया भट्टने उत्कृष्ठ भूमिका करून गंगुबाईच्या जीवनामधील संघर्ष जगासमोर आणला आहे.

गंगुबाईच्या भूमिकेसाठी तिचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. अभिनेत्री आलीया भट्टचे गंगुबाईच्या वेशामधील अनेक फोटो सध्या व्हायरल होत आहेत. पण आता खऱ्या गंगुबाईचा फोटो देखील जगासमोर आला आहे.


खऱ्या आयुष्यामध्ये गंगूबाई काठियावाडी कशी दिसत होती हे तुम्हाला माहिती आहे का? आज आम्ही तुम्हाला गंगूबाई काठियावाडीचा खरा फोटो दाखवणार आहोत. गंगुबाईचे खरे नाव गंगा जगजीवनदास काठियावाडी असे होते.

गंगुबाईचा हा फोटो तिच्या तरुणपणातील आहे. गंगा जीवनदास काठियावाडी नावाची एक मुलगी रमणिक नावाच्या मुलाच्या प्रेमात पडते आणि अभिनेत्री बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्याच्यासोबत मुंबईला येते. तो दिवस आणि नंतर गंगाची गंगू बनते त्यानंतरची गांगुची गंगाबाई.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने