साउथ चित्रपटामधील सुपरस्टार अल्लू अर्जुन सध्या त्याच्या पुष्पा चित्रपटामुळे खूपच चर्चेमध्ये आहे. पुष्पा चित्रपट प्रदर्शित होऊन एक महिना लोटला असला तरी या चित्रपटाची क्रेज अजून काही कमी झालेली नाही. अल्लू अर्जुनचा जवळचा मित्र देखील या चित्रपटामुळे खूप चर्चेमध्ये आहे.

पुष्पा चित्रपटामधील प्रत्येक भूमिका अगदी विचारपूर्वक आणि अचूकपणे साकारली आहेत. मग ती अभिनेत्री राष्मिका मंदाना असो किंवा अभिनेत्री अनुसया भारद्वाज. आज आपण या चित्रपटामधील पुष्पाच्या आईची भूमिका साकारलेल्या अभिनेत्री बद्दल जाणून घेणार आहोत.

पुष्पा चित्रपटामधील पुष्पाच्या आईची भूमिका साउथ फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री कल्पलताने साकारली आहे. अभिनेत्री कल्पलताने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. सर्वात चर्चित चित्रपट बाहुबली चित्रपटामध्ये देखील तिने काम केले आहे. पण तिची या चित्रपटामध्ये खूपच कमी भूमिका होती.

कल्पलताने बाहुबली चित्रपटामध्ये गावकऱ्याची भूमिका साकारली होती. याव्यतिरिक्त तिने अनुष्का शेट्टीच्या भागमती आणि विजय देवरकोंडाच्या अर्जुन रेड्डी सारख्या हिट चित्रपटामध्ये देखील भूमिका केली आहे.

कल्पलता सोशल मिडियावर देखील खूप अॅक्टिव्ह असते. तिचे सोशल मिडियावरील फोटो पाहून तुम्हाला विश्वास देखील बसणार नाही कि तिने पुष्पाच्या आईची भूमिका साकारली आहे. पुष्पा चित्रपटामध्ये कल्पलता एका गरीब आईच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळाली होती. विशेष म्हणजे अल्लू अर्जुन आणि कल्पलताच्या वयामध्ये अवघ्या ५ वर्षांचे अंतर आहे. अभिनेता अल्लू अर्जुन ३९ वर्षांचा आहे तर कल्पलता ४५ वर्षांची आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने