साउथ फिल्म इंडस्ट्रीमधील टॉपची अभिनेत्री समांथा रूथ प्रभु आणि नागा चैतन्य यांचा नुकताच घटस्फोट झाला आहे. दोघेही सध्या यामुळे खूपच चर्चेमध्ये आहेत. नागा चैतन्य साउथ फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेता नागार्जुनचा मुलगा असून नागा चैतन्य आणि समांथाचे लग्न २०१७ मध्ये झाले होते. दोघांचे लग्न मोडल्यामुळे त्यांच्या फॅन्सना मोठा धक्का बसला आहे.

सोशल मिडियावर नेहमी अॅक्टिव राहणारी समांथाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेयर केली आहे. समांथाने सपोर्टसाठी फॅन्सचे आभार मानले आहेत त्याचबरोबर तिने आपल्याबद्दल पसरत असलेल्या अफवांवरही सडेतोड उत्तर दिले आहे.

लग्नाच्या अवघ्या चार वर्षांमध्येच समांथाचा संसार मोडला आहे तर सध्या तिच्याबद्दल अनेक धक्कादायक अफवा पसरवल्या जात आहत. या अफवांचे अभिनेत्री समांथाने पूर्णपणे खंडन केले आहे. समांथाने लिहिले आहे कि माझ्या खाजगी आयुष्यामध्ये झालेल्या नुकसानीत तुम्ही दिलेल्या भावनात्मक साथीने मला खूप आनंद झाला आहे. सर्वांचे खूप खूप आभार.

त्याचबरोबर माझ्याबद्दल पसरवल्या गेलेल्या खोट्या अफवांपासून देखील माझा बचाव करण्यासाठी तुमचे खूप खूप आभार समांथाने पुढे लिहिले आहे कि, माझ्याबद्दल अफवा पसरवल्या जात आहेत कि माझे अफेयर आहे, मला मुल नको होत, मी खूप स्वार्थी आहे आणि माझं अ’बॉर्शन झालं आहे.

समांथाने काही दिवसांपूर्वी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेयर करून आपल्या घटस्फोटाची पुष्टी केली होती. तिने लिहिले होते कि माझ्या सर्व हितचिंतकांना सांगायचे आहे कि, आम्ही खूप विचार करून एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.

आमचे मार्ग आता वेगवेगळे आहेत. आम्ही खूपच नशीबवान आहोत कि आमची मैत्री जवळ जवळ एक दशकापेक्षाहि जुनी आहे. मला विश्वास आहे कि, आमच्या मैत्रीमधील बाँडिंग नेहमी अशीच राहील. तुमच्याकडून मिळालेल्या सपोर्टसाठी खूप खूप धन्यवाद.

नागा चैतन्य आणि समांथा २०१७ मध्ये विवाह बंधनामध्ये अडकले होते. नागाचे वडील अभिनेता नागार्जुनसोबतही समांथाची खूपच चांगली बॉंडिंग होती. नागार्जुन देखील हे लग्न मोडल्यामुळे दुखी दिसले. नागार्जुनने यावर प्रतिक्रीया दिली कि, मला खूप जड अंतकरणाने सांगायचे आहे कि नागा चैतन्य आणि समांथादरम्यान जे काही झाले ते खूप वाईट झाले.

एक पत्नी आणि पातीमध्ये जे काही असते ते खूप पर्सनल असते. दोघेही खूप चांगले आहेत. आमच्या कुटुंबाने समांथासोबत घालवलेले क्षण आम्ही कधीच विसरणार नाही ती नेहमीच आमच्यासाठी खास राहील. देव दोघांचंही भलं करो.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने