हिंदू धर्मशास्त्रानुसार आठवड्यातील प्रत्येक दिवसाचे स्वतःचे वेगळे महत्त्व आहे. आपण दररोज आपल्या कुलदेवतांची पूजा करत असतो. आपणास हे माहिती असेल की बुधवारी प्रथम पूजनीय गणपती बाप्पाला मानले जाते. आपल्याकडे विघ्नहर्ता आणि मंगलाकारक या नावाने देखील गणपती बाप्पाला ओळखले जाते.

तुम्ही अनेक वेळा पाहिले असेल की जेव्हा जेव्हा आपल्या घरात कोणतेही शुभ कार्य करतात तेव्हा गणपतीचे सर्व प्रथम पूजन केले जाते. परंतु असे असून देखील तुम्हाला माहिती आहे का कि मुलींना बुधवारी सासरी का पाठवले जात नाही.

भारतीय संस्कृतीमध्ये अशी मान्यता आहे की मुलींना बुधवारी त्यांच्या सासरच्या घरी पाठवू नये, यामागे एक कारण असल्याचे मानले जाते. ज्योतिषशास्त्रात असे म्हटले जाते की बुधवारी मुलींना निरोप देणे शुभ नसते. यास खूप अशुभ मानले गेले आहे.

अशी मान्यता आहे की आपल्या मुलींनी बुधवारी सासरी पाठवू नये. या दिवशी मुलीला सोडण्यास जाण्याच्या मार्गावर अनेक प्रकारचे अपघात होण्याची शक्यता असते. इतकेच नाही तर आपल्या मुलीचे तिच्या सासरच्यांशी असलेले सं-बंध देखील बिघडू शकतात. शास्त्रामध्ये या अपशकुनासंबंधी अनेक कारणांची व्याख्या देखील आहे.

बुध ग्रह आणि चंद्राचे शत्रुत्व: एका पौराणिक मान्यतानुसार, बुध ग्रह आणि चंद्राला आपले शत्रू मानतो, परंतु चंद्रासोबत असे नाही, तो बुधला शत्रू मानत नाही. ज्योतिषशास्त्रात चंद्र हा प्रवासाचा कारक मानला जातो आणि बुध उत्पन्नाचा किंवा नफ्याचा कारक आहे. त्यामुळे बुधवारी कोणत्याही प्रकारचे प्रवास हानिकारक मानले जाते. जर आपल्या कुंडलीत बुधची स्थिती खराब असेल तर एखादा अपघात होण्याची किंवा काही प्रमाणात नकारात्मक घटना होण्याची शक्यता वाढते.

ज्योतिषशास्त्रात चंद्र हा प्रवासाचा कारक मानला जातो आणि बुध हा उत्पन्न किंवा व्यवसायाचा कारक मानले गेले आहे. म्हणूनच बुधवारी कोणत्याही प्रकारच्या व्यवसायाच्या सहलीत आणि इतर कोणत्याही प्रकारच्या प्रवासामध्ये तोटा होतो. जर आपला बुध खराब असेल तर एखादा अपघात होण्याची किंवा काही प्रमाणात नकारात्मक घटना होण्याची शक्यता वाढते.

म्हणूनच अशी मान्यता आहे की बुधवारी मुलींना सासरी पाठवू नये. बुधवारी आणखी काही अशी कामे आहेत जी कामे केल्याने त्या व्यक्तीची बुद्धिमत्ता कमी होते. तसेच व्यक्तीचे शत्रू देखील वाढतात आणि आपल्या मुलींचे सासरच्यांशी सं-बंध बिघडू शकतात, कदाचित त्यांच्यामध्ये भांडणे वाद-विवाद होवू शकतात. या सर्व कारणांसाठी आणि या समस्या टाळण्यासाठी बुधवारी अशी कामे केली जात नाहीत.

तसेच आपल्या आई-बहिण समान मुलींचा बुधवारी कधीही अपमान करु नये. असे केल्याने बुध ग्रहाची स्थिती आपल्या कुंडलीत खराब होईल. असे केल्याने तुमची बौद्धिक क्षमता कमी होईल. म्हणून बुधवारी आपल्या आई आणि बहिणी समान असणाऱ्या महिलांना कपडे साडी किंवा हिरव्या बांगड्या दान केल्या जातात.

1 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने