कपिल शर्माचा ‘द कपिल शर्मा शो’ हा सर्वात लोकप्रिय कॉमेडी शो आहे. हा शो दर्शक खूपच आवडीने पाहतात. कपिल शर्माच्या या शोमध्ये अनेक कलाकार हजेरी लावत असतात. नुकतेच भूत पोलिस चित्रपटाच्या कलाकारांनी कपिल शर्माच्या शोमध्ये हजेरी लावली होती. याचा प्रोमो नुकताच सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये अभिनेत्री यामी गौतम, अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसन आणि अभिनेता सैफ अली खान दिसत आहेत.

हा प्रोमो सोनी टिव्हीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेयर केला आहे. यामध्ये कपिल शर्मा अभिनेत्री यामीला म्हणतो कि आम्हाला असे ऐकायला मिळाले आहे कि तुला आणि आदित्यला हनिमूनला जाताना कुटुंबियांना सोबत घेऊन जायचे होते.

यावर कपिल स्वत:च उत्तर देत म्हणाला कि, कुटुंबियांना तिथे कोण घेऊन जात असत का, तर यावर उत्तर देताना यामी म्हणाली कि आमच्या दोघांची देखील इच्छा होती कि सर्वांनी एकत्र जावे, यावर सैफ हसत हसत म्हणाला कि हे खरे आहे का यावर यामी म्हणाली कि होय हे खरे आहे.

अभिनेत्री यामी गौतमने आदित्य घरसोबत ४ जून रोजी लग्न केले होते. यामीने आपल्या लग्नाचे काही फोटो आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरून शेयर केले होते. या दोघांचे लग्नाचे फोटो सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाले होते. दोघांच्या लग्नामध्ये फक्त जवळचे नातेवाईक आणि मित्र उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने