हस्तरेखा शास्त्रामध्ये याचा उल्लेख केला गेला आहे कि लांब, दाट केस असणाऱ्या महिला नेहमी सुखी असतात. ठीक त्याचप्रकारे शरीराच्या अंगावर केस असणे देखील शुभ-अशुभ मानले जाते. आपण अशा अनेक महिलांना पाहिले असेल कि ज्यांच्या हातावर आणि पायावर देखील पुरुषांप्रमाणे केस असतात आणि महिला ते केस लपवण्यासाठी अनेक प्रयत्न करतात.

जगभरामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या शरीरावर केस असतात. कोणाच्या हातावर असतात तर कोणाच्या पायावर तर कोणाच्या इतर अंगावर. अशामध्ये महिलांच्या शरीरावर केस कमी असतात तर पुरुषांच्या शरीरावर अधिक केस असतात. ज्योतिष शास्त्रानुसार केस कमी आणि जास्त असणे अनेक शुभ अशुभ संकेत देते.

आपल्या सर्वांना माहिती आहे कि ज्या महिलांचे केस लांब आणि दाट असतात त्या महिला भाग्यशाली असतात आणि ज्या महिलांच्या पापणीचे केस काळे असता त्या महिला देखील खूप भाग्यशाली मानल्या जातात. अशामध्ये आज आपण शरीरावर केस कुठे जास्त असल्याने काय होते ते पाहणार आहोत.

महिलांच्या या भागावर केस नसावेत: असे म्हंटले जाते कि महिलांच्या शरीराचे काही अंग असे असतात जिथे केस असणे बिलकुल देखील शुभ मानले जात नाही आणि या अंगामध्ये हात देखील सामील आहेत. असे म्हंटले जाते कि ज्या महिलांच्या हातावर जास्त प्रमाणात केस असतात अशा महिला खूपच रागीट स्वभावाच्या मानल्या जातात आणि या छोट्या छोट्या गोष्टीवर लोकांशी वाद घालू लागतात. लग्नाच्या नंतर या महिला आपल्या पतीला खुश ठेऊ शकत नाहीत. कमी केस असणाऱ्या महिला किंवा केस नसणाऱ्या महिला खूपच चांगल्या असतात.

पुरुषांसाठी असतात शुभ: असे म्हंटले जाते कि ज्या पुरुषांच्या हातावर जास्त प्रमाणात केस असतात असे पुरुष शुभ मानले जातात आणि असे पुरुष बुद्धीने खूपच तल्लख आणि ज्ञानी असतात. ज्या पुरुषांच्या हातावर कमी केस किंवा बिलकुल केस नसतात असे पुरुष मतलबी असतात आणि हे नेहमी इतर लोकांना त्रास देण्याचे काम करतात. असे पुरुष कोणत्याही व्यक्तीला खुश पाहू शकत नाहीत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने