टाचांच्या भेगांचे मुख्य कारण वेळेवर न जेवणे, व्हिटॅमिन ई ची कमी, कॅल्शियम आणि लोहाची कमतरता असू शकते. बाजारामध्ये अशा अनेक क्रीम मिळतात ज्या टाचांच्या भेगा ठीक करण्याचा दावा करतात पण यावर जेवढा घरगुती उपाय केला जाईल तितके चांगले राहते. पायांची योग्य काळजी घेतली नाही तर पायांच्या टाचांना भेगा पडतात.

अनवाणी चालण्यामुळे किंवा रक्ताच्या कमतरतेमुळे पायाला भेगा पडतात जर तुम्ही पायाच्या सफाईवर लक्ष दिले नाही तर टाचांना भेगा पडतात. टाचांना भेगा पडल्यास पाय खूपच घाणेरडे दिसतात. अनेक वेळा लोकांना टाचांना पडलेल्या भेगांमुळे शरमिंदा व्हावे लागते.

टाचांना भेगा पडल्यानंतर त्याची योग्य काळजी घेतली गेली नाही तर त्यामधून रक्त देखील निघू लागते आणि त्यामुळे खूप वेदना होतात. शरीरामध्ये उष्णता वाढल्यामुळे, अनवाणी चालल्यामुळे, रक्ताची कमी यामुळे टाचांना भेगा पडतात.

जसे आपण सुंदर दिसण्यासाठी अनेक प्रकारचे उपाय करतो तसे टाचांच्या भेगासाठी काही उपाय केले पाहिजेत. कारण टाचांच्या भेगांमुळे पायाचे सौंदर्य निघून जाते. कधीकधी टाचांना इतक्या भेगा पडतात कि त्यामुळे चालताना देखील त्रास होतो. यामुळे आज आपण साधा आणि घरगुती उपाय जाणून घेणार आहोत ज्याच्या मदतीने आपण टाचांच्या भेगांपासून मुक्ती मिळवू शकतो.

सर्वात पहिला एक वाटी घ्या आणि यामध्ये अर्धा चमचा कोलगेट टाका. यानंतर यामध्ये एक ईवीएम कॅप्सूल टाका आणि दोन्हीचे चांगले मिश्रण तयार करून घ्या. याची पेस्ट तयार झाल्यानंतर दररोज हि पेस्ट आपल्या टाचांच्या भेगांवर लावा आणि सकाळी उठल्यानंतर स्वच्छ पाण्याने पाय धुवून घ्या. असे नियमित रूपाने केल्यास पायाच्या टाचांवरील भेगा काही दिवसांमध्ये निघून जातील.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने