सिद्धार्थ शुक्ला आता आपल्यामध्ये नाही राहिला. त्याच्या कुटुंबियांसोबत त्याचे चाहते देखील धक्क्यामध्ये आहेत. त्याच्या कुटुंबियांपासून त्याचे चाहते आणि मनोरंजन क्षेत्रातील लोकांनाहि अजून विश्वास बसत नाही आहे कि तो आता आपल्यामध्ये नाही.

या सर्वांमध्ये सिद्धार्थ शुक्लाच्या जवळची दोस्त शहनाज कौर गिलचे मन सुन्न करणारे विधान समोर आले आहे आणि याबद्दल इतर कोणीही नाही तर शहनाजच्या वडिलांनी स्वतः सांगितले आहे. मिडीयाच्या माहितीनुसार शहनाज वडिलांना म्हणाली कि आता मी कसे जगू पप्पा. तो माझ्या हातामध्ये हे जग सोडून गेला.

सिद्धार्थ शुक्लासाठी शहनाजने आपले प्रेम अनेक वेळा व्यक्त केले आहे. आता सिद्धार्थच्या निधनावर शहनाज पूर्णपणे खचली आहे. शहनाजचे वडील संतोख सिंह सुख म्हणाले कि शहनाजची खूपच वाईट परिस्थिती झाली आहे. तिने म्हंटले कि पप्पा त्याने माझ्या हातामध्ये जीव सोडला. तो माझ्या हातामध्ये हे जग सोडून निघून गेला. मी आता कसे जगू, काय करू ?

मिडियाच्या माहितीनुसार शहनाजच्या वडिलांनी पुढे सांगितले कि शहनाज सिद्धार्थला सकाळी नेहमीप्रमाणे उठवायला गेली तेव्हा त्याने काहीच प्रतिसाद दिला नाही. तिने त्याला आपल्या हातामध्ये पकडले तरीही त्याने प्रतिक्रिया केली नाही. नंतर शहनाजने सिद्धार्थच्या पूर्ण कुटुंबाला बोलावले जे त्याच्या आसपास राहत होते आणि नंतर त्याला हॉस्पिटलला नेण्यात आले. शहनाज म्हणत आहे कि आता तो नाही तर मी कसे राहू.

इतकेच नाही तर शहनाजचे वडील संतोख सिंह सुख म्हणाले कि त्यांना या गोष्टीची कधीच चिंता नव्हती कि माझी मुलगी मुंबईमध्ये एकटी राहते कारण एका कुटुंबाप्रमाणे सिद्धार्थ, शहनाजची काळजी घेत असे. पण आता ते खूपच चिंतेमध्ये आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने