भारतीय क्रिकेट टीमचा सलामीवीर शिखर धवनचा घटस्फोट झाला आहे. शिखर धवनची पत्नी आयशा मुखर्जीने इंस्टाग्रामवर एक लांबलचक पोस्ट शेयर करून याची माहिती दिली आहे. तथापि अजूनपर्यंत शिखर धवनकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. ऑस्ट्रेलियाची राहणारी आयशा मुखर्जीने २०१२ मध्ये शिखर धवनसोबत दुसरे लग्न केले होते. तिचे पहिले लग्न ऑस्ट्रेलियामधील व्यावसायिकाशी झाले होते. आणि त्यांना दोन मुले आहेत. शिखर धवनपेक्षा ती जवळ जवळ ११ वर्षाने मोठी आहे आणि शिखर धवन पासून तिला एक मुलगा आहे ज्याचा जन्म लग्नाच्या दोन वर्षानंतर २०१४ मध्ये झाला होता.

शिखर धवन आणि आयशा मुखर्जीची मैत्री फेसबुकवर झाली होती आणि नंतर हे दोघे हरभजन सिंहच्या माध्यमातून एकत्र आले. २०१२ मध्ये दोघांनी लग्न केले होते आणि २०१४ मध्ये त्यांना एक मुलगा झाला. लग्नाच्या जवळ जवळ ९ वर्षानंतर त्यांचा घटस्फोट झाला आहे. आयशाने याला खूपच दुःखद सांगितले आहे. तथापि अजूनपर्यंत शिखर धवनकडून यावर पुष्टी झाली नाही. आता त्याच्या प्रतिक्रियेची सर्वजण वाट पाहत आहेत.

आयशाने इंस्टाग्रामवर दिली माहिती: आयशाने घटस्फोटाबद्दल इंस्टाग्रामवर लिहिले आहे कि, एकदा घटस्फोट झाला आहे, असे वाटत आहे कि दुसऱ्यांदा बरेच काही धोक्यात होते. मला खूप काही सिद्ध करायचे होते. यामुळे जेव्हा माझे दुसरे लग्न मोडले तेव्हा हे खूपच भीतीदायक होते. मी विचार केला कि घटस्फोट खूपच वाईट शब्द आहे. पण नंतर माझा दोन वेळा घटस्फोट झाला. या दोन शब्दांचे किती शक्तिशाली अर्थ आणि संबंधी होऊ शकतात. मला घटस्फोटीत म्हणून याची जाणीव झाली आहे.

पहिल्यांदा जेव्हा माझा घटस्फोट झाला तेव्हा मी खूप जास्त घाबरले होते. मला वाटत होते कि मी अयशस्वी झाले आणि त्यावेळी मी खूप चुकीचे करत होते. मला वाटले कि मी सर्वांना निराश केले आणि मला स्वार्थी देखील वाटले. मला वाटले कि मी माझ्या आईवडिलांना निराश करत आहे. मला वाटले कि मी माझ्या मुलांन निराश केले आहे. घटस्फोट खूपच घाणेरडा शब्द आहे.

२००० मध्ये झाले होते पहिले लग्न: आयशाचे पहिले लग्न ऑस्ट्रेलियन व्यावसायिकाशी झाले होते. आयशाच्या त्यावेळी दोन मुली होती. तिच्या पहिल्या मुलीचा जन्म २००० मध्ये झाला होता जिचे नाव आलिया आहे नंतर तिने आपली दुसरी मुलगी रियाला २००५ मध्ये जन्म दिला.

सध्या यूएईमध्ये आहे शिखर: सध्या शिखर धवन आईपीएल खेळण्यासाठी यूएईमध्ये आहे आणि सामन्याची तयारी करत आहे. धवन दिल्लीकडून आईपीएल खेळतो. सध्या घटस्फोटाच्या बातमी दरम्यान आता सर्वांची नजर शिखर धवनवर आहे त्याची काय प्रतिक्रिया येते ते पाहण्यासाठी.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने