बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खान आपल्या अभिनयाव्यतिरिक्त हाजिरजवाबी आणि काळजीपूर्वक उत्तर देण्यासाठी देखील ओळखला जातो. तथापि एकदा किंग खानने एका मुलाखतीमध्ये आपला मुलगा आर्यनबद्दल एक अशी गोष्ट व्यक्त केली ज्याचा आपण विचार देखील करू शकत नाही. शाहरुख खान म्हणाल कि आर्यनने अशी सर्व चुकीची कामे करावीत जी मला माझ्या तरुणपणामध्ये करायला मिळाली नाहीत.

शाहरुख खान १९९७ मध्ये सिमी ग्रेवालच्या टॉक शोमध्ये गेला होता. या टॉक शोमध्ये त्याच्यासोबत गौरी खानदेखील पोहोचली होती. गौरीने तेव्हा काही काळापूर्वी आपला मुलगा आर्यनला जन्म दिला होता. या निमित्ताने सिमीने शाहरुख आणि गौरला त्याच्या मुलाबद्दल विचारले.

सिमी ग्रेवालने शाहरुखला विचारले कि तो आर्यनला कसे वाढवणार आहे, तर याबद्दल उत्तर देताना बॉलीवूड अभिनेता शाहरुखने म्हंटले कि, माझी अशी इच्छा आहे कि आर्यनने ती सर्व कामे करावीत जी मला टीनएजमध्ये करायला मिळाली नाहीत. शाहरुख पुढे म्हणाला होता कि त्याला असे बरेच काही करायचे आहे जे त्याला इच्छा असून देखील करता आले नाही, कारण त्याच्याजवळ इतक्या सुविधा नव्हत्या.

शाहरुखने सिमीला म्हंटले कि आर्यन जेव्हा ३-४ वर्षाचा होईल तेव्हा मी त्याला म्हणेन कि तो मुलींच्या मागे जाऊ शकतो, ड्र’ग्स घेऊ शकतो, से’क्स करू शकतो आणि हे तो जेवढ्या लवकर करेल तेवढे चांगले आहे जे मी नाही करू शकतो. जर आर्यन घरातून बाहेर जाईल तेव्हा माझी इच्छा असेल कि माझ्यासोबत जे काम करतात त्यांच्या मुली असतील असे माझ्याजवळ येऊन त्याची तक्रार करतील.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने