बॉलीवूड आणि साउथ फिल्म इंडस्ट्रीमधील दमदार अभिनेता आणि स्टायलिश शैलीने रजनीकांत यांनी चाहत्यांच्या मनामध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. रजनीकांत अशा अभिनेत्यांपैकी एक आहेत ज्यांच्यावर चित्रपट निर्माते करोडो रुपये खर्च करण्यास तयार असतात. याशिवाय अनेक कलाकार असे आहेत जे रजनीकांत यांच्यासोबत काम करण्यास नेहमी तयार राहतात.

ते आपल्या अॅक्शन आणि स्टाईलने दर्शकांना वेडे बनवतात. आज रजनीकांत ज्या सफलतेच्या शिखरावर आहेत तेथे पोहोचण्या अगोदर रजनीकांत एक बस कंडक्टर होते. पण ते करोडो रुपयांच्या संपत्तीचे मालक आहेत. रजनीकांत हे ३७६ करोड रुपयांच्या संपत्तीचे मालक आहेत. त्यांच्याजवळ देशाच्या इतर भागामध्ये देखील प्रॉपर्टीज आहेत. कदाचित खूपच कमी लोकांना माहिती असेल कि रजनीकांत यांचे करियर सुरु होण्यापूर्वी त्यांचे नाव शिवाजी राव गायकवाड होते.

सुपरस्टार रजनीकांत आपल्या कुटुंबासोबत चेन्नईच्या पॉइज़ गार्डनमध्ये आपल्या अलिशान बंगल्यामध्ये राहतात. त्यांच्या या अलिशान बंगल्याची किंमत ३५ करोड रुपये इतकी आहे. त्यांच्या पुण्याच्या घराबद्दल बोलायचे झाले तर हे त्यापुढे काहीही नाही. त्यांचे हे घर आतून खूपच आलिशान आहे, याला बाहेरून पांढरा रंग देण्यात आला आहे. घरासमोरील संपूर्ण परिसर झाडांनी झाकला आहे.

मुख्य द्वारापासून ते घराच्या प्रवेशद्वारापर्यंतचा रस्ता खूपच सुंदर बनवला गेला आहे. त्यांच्या घरामधील लिविंग रूम खूपच सुंदर आणि स्टाईलिश आहे. यामध्ये अनेक लोकांना एकत्र बसण्यासाठी सोय केली गेली आहे. खोलीच्या भिंती काचेच्या बनवल्या गेल्या आहेत ज्या लुकला आणखीनच क्लासी बनवतात.

त्यांच्या बैठकीच्या बाजूला एक सुंदर स्वयंपाकघर बनवले गेले आहे. जिथले काळ्या रंगाचे ग्लास डाइनिंग टेबल सर्वांचे लक्ष वेधून घेते. त्यांनी घरामध्ये एक पार्किंग हाऊस देखील बनवला आहे. इथे अनेक वाहने एकाच वेळी पार्क केले जाऊ शकतात.

याशिवाय रजनीकांत यांचे पुण्यामध्ये एक ब्लॅक अँड व्हाईट थीमचे घर आहे. त्यांच्या घरचे किचन खूपच आकर्षित वाटते. जर तुम्ही रजनीकांत यांच्या या घराला पाहाल तर दंग राहाल. इतकेच नाही तर त्यांचे हे घर फाईव स्टार हॉटेलला देखील टक्कर देते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने