पितृ पक्षाचा आरंभ झाला आहे. पितृपक्षामध्ये पूर्वजांच्या आठवणीमध्ये दानधर्म करण्याची परंपरा आहे. पितृ पक्षामध्ये पितरांच्या मुक्तीसाठी चांगले कर्म केले जातात. एका पक्षापर्यंत चालणाऱ्या या पक्षामध्ये पितरांना विधी-विधानाने तर्पण केले जाते.

श्राध्द पक्षाचे समापन सर्वपितृ अमावस्येला म्हणजे ६ ऑक्टोबर २०२१ रोजी होईल. श्राद्धाचा अर्थ श्रद्धापूर्वी पितरांना प्रसन्न करणे असा होतो. हिंदू धर्मामध्ये श्राद्ध पर्वाला एक विशेष महत्व आहे. प्रत्येक वर्षी भाद्रपद महिन्याच्या पूर्णिमेनंतर अश्विन महिन्याच्या अमावस्येपर्यंत म्हणजे १६ दिवस श्राद्ध पर्व साजरा केला जातो.

पितरांसाठी करा हे कार्य: सर्वप्रथम पूर्वजांच्या इच्छेनुसार दान-पुण्याचे कार्य करावे. दानामध्ये सर्वात प्रथम गोदान करावे. यानंतर तूप, चांदी, पैसे, फळ, मीठ, तीळ, सोने, वस्त्र आणि गुळ दान करावे. हे लक्षात ठेवावे कि हे दान संकल्प केल्यानंतरच आपल्या पुरोहित किंवा ब्राम्हणाला द्यावे. श्राद्ध पक्षामध्ये हे दान तिथीनुसार करावे असे केल्याने पूर्वजांचा आशीर्वाद प्राप्त होतो.

पितरांना करा दया दृष्टीची प्रार्थना: कोणत्याही चुकीसाठी किंवा पश्चातापासाठी तुम्ही पितरांना क्षमा मागू शकता. जर तुम्ही एखादा अपराध केला असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही आपल्या गुरु सोबत बोलून आपल्या पितरांना क्षमा मागू शकता आणि त्यांच्या फोटोवर तिलक लावावा. यासोबत दररोज नियमित रूपाने संध्याकाळी तिळाच्या तेलामध्ये दिवा जरूर लावावा. त्याचबरोबर आपल्या कुटुंबासोबत त्यांच्या तिथीवर भोजन वाटावे आणि आपल्या चुकीला स्वीकार करून क्षमा याचना करावी.

जर पूर्वज पौर्णिमेच्या दिवशी गेले असतील तर पौर्णिमेच्या दिवशीच श्राद्ध ऋषींना समर्पित होते. पूर्वज ज्यांच्यामुळे आपला गोत्र आहे त्यांना नियमित तर्पण करावे. तर त्यांचा फोटो समोर ठेऊन त्यांना पांढऱ्या चंदनाचा तिलक करून चंदनाची माळ घालावी.

त्याचबरोबर पितरांना इलायची, केशर, साखर, मधापासून बनलेली खीर अर्पित करावी. यासोबत गायीच्या शेणाचे शेणकुट अग्नीमध्ये प्रज्वलित करून आपल्या पितरांसाठी तीन पिंड बनवून आहुती द्यावी. यानंतर कावळा, गाय आणि कुत्र्याला देखील प्रसाद द्यावा.

श्राद्ध करताना या गोष्टींची घ्या विशेष काळजी: या गोष्टीची विशेष काळजी घ्यावी कि जेव्हा तुम्ही श्राद्ध करत असाल तेव्हा उत्साहवर्धक कोणतेही काम करू नये. श्राद्ध पितरांसाठी भावनिक श्रंद्धाजलिचा काळ असतो. यादिवशी तामसिक भोजन करू नये. कुटुंबातील प्रत्येक सदस्याद्वारे दिवंगत आत्माहेतू दान जरूर करून घ्यावे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने