जगामध्ये पती-पत्नीच्या नात्याला असे नाते मानले जाते ज्यामध्ये विश्वासाची खूप गरज असते. पण आज आम्ही तुम्हाला अशी गोष्ट सांगणार आहोत जी जाणून घेतल्यानंतर तुम्ही देखील हैराण व्हाल. हि गोष्ट अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये राहणाऱ्या एका महिलेबद्दल आहे. या महिलेबद्दल जाणून घेतल्यानंतर तुम्हाला समजेल कि आई आपल्या मुलांसाठी काय करू शकते.

या महिलेचा नाव मेलानिया डारनेल आहे. मेलानिया डारनेलला नेहमी सकाळी उठल्यानंतर ताजेतवाने वाटत नसायचे. तिला नेहमी थकवा जाणवायचा. तिच्या पतिला हे समजत नव्हते कि असे कशाने होत आहे. ती सकाळी उठल्यानंतर इतकी थकलेली का असते?

मेलानियाला याचे कारण माहिती असायचे पण तिला ते सांगायची इच्छा होत नव्हती. तिच्या पतीला याबद्दल खूप विचार करावा लागला. त्याला आपल्या पत्नीला सकाळी ताजेतवाने पहायचे होते पण त्याची पत्नी नेहमी थकलेली असायची. पत्नीच्या थकव्याचे कारण जाणून घेण्यासाठी पती खूपच उत्सुक होता.

पत्नीच्या थकव्याबद्दल विचार करून पती तिच्यावर शंका घेऊ लागला आणि त्याने यामागचे कारण शोधून काढण्याचा निश्चय केला. याची सर्व माहिती काढण्यासाठी त्याने आपल्या घरामध्ये CCTV कॅमेरे लावले. पण जेव्हा त्याला CCTV फुटेजमध्ये सर्वकाही दिसले तेव्हा त्याचे होशच उडाले.

त्याने हा व्हिडीओ यूट्यूबवर देखील अपलोड केला आहे. मिलानिया आपल्या मुलांमुळे संपूर्ण रात्र झोपू शकत नव्हती. आपल्या मुलांना झोपवण्यामध्ये वेळ जात असल्याने तिला झोपण्यास वेळ मिळत नव्हता यामुळे तिला दिवसभर थकवा जाणवत होता.

पतीने पाहिले कि त्याची पत्नी तीन मुलांसाठी वेगवेगळे जेवण बनवते. तर सर्वात लहान मुलगा फक्त आईचेच दुध पीत होता, ज्यामुळे तिला थकवा जाणवायचा. यावर मेलानियाचे फक्त इतकेच म्हणणे आहे कि एका आईच्या नात्याने तिला सर्व मुलांची समान काळजी घ्यावी लागते. आपल्यावर असलेल्या जबाबदारीमुळे ती व्यवस्थित झोपू शकत नव्हती.

तिची मुले रात्रभर त्रास देत असल्यामुळे तिला चांगली झोप येत नव्हती आणि मुलांच्या देखभालीसाठी तिला सकाळी लवकर देखील उठावे लागत होते. यामुळे मेलानियाला इतर गोष्टींसाठी देखील वेळ मिळत नव्हता. तिचा पती टूरिंग जॉब करतो. यामुळे तो नेहमी बाहेरच असतो आणि मेलानिया आपल्या तिन्ही मुलांची देखभाल एकटी करते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने