'येऊ कशी तशी मी नांदायला' सिरीयलमधून दीप्ती केतकर म्हणजेच नलू मावशीला खूपच प्रसिद्धी मिळाली. आज नलू मावशीला ओळखत नाही असे कोण सापडणारच नाही. नलू मावशीची भूमिका अभिनेत्री दीप्ती केतकरने साकारली आहे. 'अवघाची संसार' या सिरीयलमधून दीप्तीने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. याचबरोबर अभिनेत्री दीप्ती 'भागो मोहन प्यारे', हम तो तेरे आशिक है यासारख्या सिरियल्समध्ये देखील अभिनय करताना पाहायला मिळाली आहे.

'मला सासू हवी' या सिरीयलमधून दीप्तीला खरी प्रसिद्धी मिळाली. या सिरीयलमध्ये तिने अभिलाषाची भूमिका साकारली होती. सिरियल्स सोबत दीप्तीने चित्रपटामध्ये अभिनय केला आहे. दीप्ती एक चांगली नृत्यांगना देखील आहे. फ्रांसमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये तिने भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.

दीप्तीने आपल्या अभिनयासोबत सौंदर्याने देखील दर्शकांचे मने जिंकली. छोट्या पडद्यावर नलूच्या भूमिकेमध्ये दिसणारी दीप्ती खऱ्या आयुष्यामध्ये खूपच ग्लॅमरस आहे. दीप्ती सोशल मिडियावर देखील खूप अॅक्टिव आहे. नेहमी ती आपले फोटो चाहत्यांसोबत शेयर करत असते. दीप्तीचे फोटो सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत असतात.

आपल्या दोन्ही लुकमुळे ती नेहमी ट्रोल होत असते. अतिशय साध्या लुकमध्ये नलू मावशीची भूमिका साकारणाऱ्या दीप्तीला खऱ्या आयुष्यामध्ये खूपच वेगळे राहायला आवडते. सोशल मिडियावरील फोटो पाहून आपण याचा अंदाज लावू शकतो.

दीप्ती केतकरच्या पतीचे नाव रोमित केतकर असे आहे. दीप्ती आणि रोमितचे लव्हमॅरेज झाले आहे. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. रोमित लाईमलाईटपासून नेहमी दूर असतो. सध्या तो अमेरिकेमध्ये स्थायिक असून तिथे तो इंजिनिअर म्हणून काम करतो. दीप्तीचे रोमितसोबत खूपच कमी फोटो पाहायला मिळतात त्यामुळे त्याच्याविषयी खूपच कमी लोकांना माहिती आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने