तुम्ही अनेक वेळा पहिले असेल कि बहुतेक लोकांच्या नाक आणि कानामध्ये देखील केस असतात. तथापि यावर मनुष्याचे नियंत्रण नसते, पण लोक हे देखील काढून टाकतात. जेणेकरून त्यांना समाजामध्ये किंवा मित्रांमध्ये खाली मान घालावी लागू नये. पण तुम्ही या केसांबद्दल काही खास गोष्टी जाणून घेतल्या तर कदाचित तुम्ही असे कधीच करणार नाही.

लोक हेच समजतात कि नाकातील केस काही कामाचे नसतात. यामुळे ते काढून टाकले जातात. पण आज आपण नाकातील केसांचे काही फायदे जाणून घेणार आहोत. नाकामध्ये केस असल्याचा सर्वात मोठा फायदा हा आहे कि जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा नाकातील केस हवेसोबत आलेली धूळ, जीवाणू आणि किटाणू शरीरामध्ये प्रवेश करण्यास प्रतिबंध करतात.

अशामध्ये जर आपण नाकातील केस काढून टाकले तर हवेमध्ये असलेले धूळ, जीवाणू आणि किटाणू आपल्या शरीरामध्ये सहजपणे प्रवेश करतील ज्यामुळे आपण एखाद्या गंभीर आजाराला बळी पडू शकतो. नाकामध्ये केस नसल्यास श्वास घेताना श्वासोच्छवासादरम्यान बॅक्टेरिया शरीरामध्ये प्रवेश करतील ज्यामुळे आपल्याला संसर्ग देखील होऊ शकतो.

अशामध्ये कधीच नाकातील सर्व केस काढू नये. तथापि जर नाकातील केस अधिक लांब झाले असतील आणि नाकातून बाहेर येत असतील तर बाहेर आलेले केस तेवढेच कापून टाकावेत. पण ते पूर्णपणे काढू नयेत नाहीतर समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने