बहुतेक लोक मुळा यासाठी खात नाहीत कारण त्याचा वास येतो. तथापि त्यांना हे माहिती नाही कि मुळ्याचे त्याच्या वासापेक्षा खूप मोठे फायदे आहेत. मुळा अनेक आजारांमध्ये औषधी म्हणून वापरला जातो. मुळा आपल्याला सहजपणे उपलब्ध होऊ शकतो. चला तर मग याचे फायदे जाणून घेऊया.

कफ दूर करण्यास फायदेशीर: मुळा शक्यतो हिवाळ्यामध्ये पिकवला जातो. या काळामध्ये सर्दी-खोकला देखील मोठ्या प्रमाणात होत असतो. जर आपण दररोज मुळा खाल्ला तर यामुळे सर्दी, खोकला सहजपणे दूर होतो. याचे कारण यामध्ये असलेले अँटी-कंजेस्टिव्ह गुणधर्म हे सर्दी, खोकला दूर करण्यास मदत करते.

कर्करोगाचा सामना करण्यासाठी देखील उपयुक्त: मुळ्यामध्ये इतर गुणांशिवाय व्हिटॅमिन सी, अँथोसायनिन्स आणि फॉलिक अॅसिड मोठ्या प्रमाणात असतात. या गुणांमुळे कर्करोगाचा सामना करण्यासाठी मदत मिळते. विशेषता किडनी, पोट, आतड्या आणि तोंडाच्या कर्करोगामध्ये मुळा प्रभावी सिद्धी होतो.

दातांच्या रोगामध्ये प्रभावी: मुळा सॅलड म्हणून किंवा थेट खाल्ल्याने हिरड्यांच्या आजारामध्ये आराम मिळतो. त्याचबरोबर याचा रस काढून गुळण्या केल्यास किंवा दात घासल्यास दातांचा आणि हिरड्यांचा आजार दूर होतो. पायरिया सारख्या दाताच्या रोगामध्ये देखील याचा खूप फायदा मिळतो.

शूगर लेवल कंट्रोल राहते: मुळ्याची आणखीन एक खास गोष्ट आहे ज्यामुळे याचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो. डायबिटीजच्या लोकांसाठी हा खूपच प्रभावी उपाय आहे. मुळा इंसुलीनला नियंत्रित ठेवतो. त्याचबरोबर शुगर लेवलला देखील संतुलित करते. यामुळे डायबिटीजवर नियंत्रण राहते.

मुरूम, फोडांवर प्रभावी: वडीलधाऱ्या व्यक्तींना तुम्ही म्हणताना ऐकले असेल कि मुळा खाल्ल्याने मुरूम, फोड, घामोळ्या आणि इतर त्वचेसमंधी विकार होत नाहीत. यामध्ये असलेले बी कॉम्प्लेक्स, जस्त, व्हिटॅमिन सी आणि फॉस्फरस त्वचेला ताजेतवाने ठेवतात.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने