दररोज अनेक अपघात होत असतात, ज्यामध्ये अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागतो. विशेष म्हणजे रस्ते अपघाताची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे आणि आता हि खूपच मोठी समस्या बनली आहे. यामुळे ट्राफिक पोलीस देखील नवनवीन युक्त्या करून जनजागृती करत असतात.

अशामध्ये सुरतमधून एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे जो सध्या सोशल मिडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. हा व्हिडीओ लोकांना देखील खूप आवडत आहे. विशेष म्हणजे व्हिडीओमधील मुलीने सर्वांचे मन जिंकले आहे.

व्हिडीओमध्ये एक व्यक्ती शाळेचे नियम तोडल्याबद्दल आपल्या लहान मुलीला रागावत आहे. मुलीशी बोलताबोलता तो गाडी चुकीच्या बाजूला नेतो. मुलीला जेव्हा हे कळते कि आपल्या वडिलांनी ट्राफिकचा नियम मोडला आहे तेव्हा ती आपल्या वडिलांवर भडकते. ती म्हणते कि आता तुम्ही केलेल्या चुकीची शिक्षा तुम्हाला कोण देणार.

कारण तुम्ही शॉर्ट कटसाठी चुकीचे मार्ग निवडला आहे. सुरत पोलिसांनी शेयर केलेल्या या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे कि, चुकीच्या बाजूने वाहने चालवणे टाळा व्हिडिओ पोस्ट करताना लिहिले आहे कि चुकीच्या दिशेने वाहने चालवणे तुमच्यासाठीच नाही तर नागरिकांसाठी देखील नुकसानदायक आहे.

जेव्हा तुम्ही वाहतुकीच्या नियमांचे पालन कराला तेव्हाच तरुण पिढीला त्याचे महत्व कळेल आणि भविष्यामध्ये ते एक शिस्तप्रिय चालक बनतील. हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगला ट्रेंड करत आहे. लोक देखील या पोस्टबद्दल सुरत पोलिसांचे कौतुक करत आहेत.

या व्हिडिओमध्ये चिराग त्रिवेदी आणि दर्शनी त्रिवेदी यांनी मुख्य भूमिका साकारली आहेत. या लघुपटाद्वारे पोलिसांनी एक चांगला संदेश दिला आहे. पोस्टवर लोकांनी देखील आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

व्हिडिओ

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने