लहान पडद्यावर नुकतीच 'माझी तुझी रेशीमगाठ' सिरीयल सुरु झाली आहे. या सिरीयलने काही दिवसांमध्ये प्रेक्षकांच्या मनामध्ये स्थान निर्माण केले आहे. सिरीयलमध्ये आपल्याला प्रार्थना बेहरे आणि श्रेयस तळपदे मुख्य भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत.

यांव्यतिरिक्त मोहन जोडी आणि संकर्षण कऱ्हाडे देखील आपल्याला मुख्य भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे परीच्या भुमिकेमधील मायरा वायकूळ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. मायरा आणि प्रार्थना 'माझी तुझी रेशीमगाठ' सिरीयलच्या सेटवर नेहमी धम्मालमस्ती करत असतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ प्रार्थनाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेयर केला आहे. ज्यामध्ये प्रार्थना आणि मायरा 'माझी तुझी रेशीमगाठ'च्या मेकअप रूममध्ये धम्मालमस्ती करताना पाहायला मिळत आहेत. व्हिडीओ शेयर करताना प्रार्थनाने लिहिले आहे कि मेकअप रूम ड्रामा. मी आणि मायरा.

या व्हिडीओमध्ये मायरा आरशापुढे बसून मेकअप करताना पाहायला मिळत आहे. यादरम्यान प्रार्थना मायराला विचारते कि तुला लिपस्टिक कोण लावलं. यावर उत्तर देताना मायरा म्हणते कि तू. यावर प्रार्थना म्हणते कि जर दुसरे कोणी विचारले तर काय सांगशील. त्यावर मायरा म्हणते कि माझे लिप्स असेच आहेत. सध्या हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. चाहते देखील या व्हिडीओला चांगला प्रतिसाद देत आहेत.

सिरीयलमध्ये श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे प्रथमच एकत्र काम करताना पाहायला मिळत आहेत. दोघांची केमिस्ट्री देखील प्रेक्षकांना खूप आवडत आहे. सुरुवातीपासूनच प्रेक्षकांना हि सिरीयल खूप आवडत आहे. मुख्य कलाकारांसोबत इतर कलाकार देखील दर्शकांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरले आहेत.

पहा व्हिडिओ:

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने