सामुद्रिक शास्त्रानुसार असे म्हंटले जाते कि व्यक्तीच्या शरीराच्या बनावटीनुसार त्याच्या जीवनामध्ये अनेक रहस्ये जाणून घेतली जाऊ शकतात आणि शामुद्रिक शास्त्रामध्ये मनुष्याच्या शरीराच्या प्रत्येक अंगावरून त्याच्या व्यक्तित्वाबद्दल माहिती मिळते. असे म्हंटले जाते कि सामुद्रिक शास्त्रामध्ये सांगितले गेलेले बहुतेक तथ्य खरे असतात. आज आपण सामुद्रिक शास्त्रानुसार मनगटाच्या आकारावरून मनुष्याच्या व्यक्तित्वाबद्दल जाणून घेणार आहोत.

लहान मनगट असलेल्या लोकांची विशेषता: ज्या लोकांचे मनगट खूप लहान असते असे लोक खूप भावूक स्वभावाचे असतात आणि यांची भावुकता यांची विशेषता मानली जाते. लहान मनगट असलेले लोक खूपच लवकर लोकांसोबत आपलेपणा सारखा व्यवहार करू लागतात. कधी कधी यांचा हा गुण त्यांना अडचणीत देखील टाकतो.

यांची कधी कधी फसवणूक देखील होते. पण तरी देखील हे मनाने खूपच स्वच्छ असतात. ते लोकांसोबत नेहमी चांगले वागण्याचा प्रयत्न करतात. या लोकांना प्रेमसंबंधांमध्ये खूप अडचणीचा सामना देखील करावा लागू शकतो. पण यांना प्रेम मिळते तेव्हा ते पूर्ण मनापासून प्रेम करतात.

जाड मनगट असलेल्या लोकांची विशेषता: ज्या लोकांचे मनगट जाड असते असे लोक खूपच मनमोकळ्या स्वभावाचे असतात. आपल्या चोहोबाजूंनी हे नेहमी एक मोकळे वातावरण बनवून ठेवतात. या लोकांमध्ये हा विशेष गुण असतो कि ते दुखी व्यक्तीला देखील आपल्या बोलण्याच्या शैलीने हसवण्याची क्षमता ठेवतात.

या लोकांना राग खूप कमी येते. यांची जीवन जगण्याची कला खूपच सुंदर असते आणि यांचे असे मानणे असते कि जीवनामध्ये फक्त एंजॉयमेंटच असते आणि आयुष्य हे नेहमी आनंदाने जगले पाहिजे. हे लोक स्ट्रेस बिलकुल देखील घेत नाहीत आणि विशेष म्हणजे यांचे अनेक प्रेमसंबंध असतात.

रुंद मनगट असलेल्या लोकांची विशेषता: रुंद मनगट असलेल्या लोकांमध्ये हि खासियत असते कि हे लोक खूप स्वभामानी आणि दृढ निश्चयी असतात. हे लोक कोणतेही काम करण्यापूर्वी दहा वेळा विचार करतात आणि यामुळे यांच्या जास्त चुका देखील होत नाही. प्रत्येक काम चांगल्या प्रकारे समजून घेतल्यानंतर ते काम पूर्ण करतात.

यांची एक खासियत हि देखील असते कि यांना नातेवाईकांकडून देखील खूप प्रेम मिळते आणि यांचे नाते सर्वांसोबत नेहमी चांगले बनून राहते. पण यांच्यामध्ये एक कमी असते ती म्हणजे यांना आपल्या रागावर नियंत्रण ठेवता येत नाही. यांना खूपच लवकर राग येतो. यामुळे त्यांची काही कामे देखील बिघडतात. हे लोक आपल्या जोडीदाराला नेहमी खुश ठेवतात.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने