बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमधील अभिनेत्री मलायका अरोरा हि लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सध्या अभिनेत्री मलायका अरोरा फिल्म इंडस्ट्रीपासून दूर असून ती आपल्या फिटनेस आणि फॅशनमुळे मात्र नेहमी चर्चेमध्ये राहत असते. मलायका सोशल मिडियावर नेहमी अॅक्टिव असते. सोशल मिडियावर ती नेहमी आपले फोटो शेयर करून आपल्या चाहत्यांच्या संपर्कामध्ये राहत असते. तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडियावर नेहमी व्हायरल होत असतात.

यावेळी मात्र अभिनेत्री मलायका अरोरा एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेमध्ये आली आहे. मलायका ‘सुपर मॉडेल ऑफ द इयर’ या शोची परीक्षक असून यामध्ये तिने एक मोठे वक्तव्य केले आहे. मलायकासोबत परीक्षक असलेल्या मिलिंद सोमणने मलायकाला एक पुरुषांबद्दल प्रश्न विचारला कि अशा कोणत्या तीन गोष्टी आहेत ज्यामुळे तू पुरुषांकडे आकर्षित होतेस.

यावर उत्तर देताना मलायका म्हणाली कि, मला दाढी मिशा नसलेले पुरुष आवडत नाहीत, दाढी असल्यास मला तो क्युट वाटतो. त्या व्यक्तीला दाढी असावी, त्याला फ्लर्ट देखील करता आले पाहिजे, विशेष म्हणजे तो एक चांगला किसर असला पाहिजे.

यादरम्यान जेव्हा तिला विचारले कि सगळ्यात शेवटी तू अर्जुनला कोणता मेसेज केला होतास, यावर उत्तर देताना मलायका म्हणाली कि मी अर्जुनला सगळ्यात शेवटी ‘आय लव्ह यू टू’ असा मेसेज केला होता. मलायका आणि अर्जुन सोशल मिडियावर नेहमी अॅक्टिव असतात. सोशल मिडियावर दोघेही अनेकवेळा आपले फोटो शेयर करत असतात. २०१९ मध्ये त्यांनी सोशल मिडियाद्वारे आपण रिलेशनशिपमध्ये असल्याचे जाहीर केले होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने