बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलाईका अरोराचे रिलेशनशिप आता सर्वांसमोर आले आहे. जवळ जवळ सर्वांनाच माहिती आहे कि हे दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत. ते एकमेकांसोबत सोशल मिडियावर आपले फोटो देखील शेयर करतात. आता हे दोघे एकमेकांसोबत व्हेकेशनवर देखील जात आहेत.

एकमेकांच्या कुटुंबासोबत देखील पाहायला मिळतात. सोशल मिडियावर पाहिले गेले आहे कि नेहमी कपल गोल सिद्ध करण्यासाठी जोडपे एकमेकांचे कौतुक करण्यासाठी पोस्ट लिहितात. मलाईका आणि अर्जुन कपूरचे चाहते दोघांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

सध्या अर्जुन कपूर आणि मलाईका अरोरा खूपच चर्चेमध्ये राहत आहेत. एका मिडिया रिपोर्टनुसार अर्जुनने मुंबई बांद्रामध्ये ४ बीएचके सी फेसिंग प्रॉपर्टी खरेदी केली आहे ज्याची किंमत जवळ जवळ २० ते २२ करोड रुपये इतकी आहे. यामध्ये खास गोष्ट हि आहे कि अर्जुन कपूरने हि प्रॉपर्टी आपली गर्लफ्रेंड मलाईका अरोराच्या घराच्या समोर घेतली आहे.

तसे तर नेहमी अर्जुन कपूर मलाईकाच्या घरी जाताना दिसतो पण अर्जुन कपूर आता आपल्या नवीन घरामध्ये शिफ्ट होणार आहे त्यामुळे त्याला आता मलाईकाच्या घरी जाताना जास्त वेळ लागणार नाही. मलाईका आणि अर्जुनच्या रिलेशनशिपचा खुलासा सर्वांसमोर झाला आहे दोघे एकत्र पार्टी, इव्हेंट, व्हेकेशनला पाहायला मिळतात.

गेल्या काही दिवसांपूर्वी अर्जुन कपूरने एका मुलाखतीमध्ये मलाईका अरोरा आणि तिच्या मुलाबद्ल रिअॅक्शन देताना म्हंटले होते कि मी माझ्या पर्सनल लाईफबद्दल जास्त बोलणे पसंत करत नाही कारण मला वाटते कि तुम्हाला तुमच्या पार्टनरची रिस्पेक्ट करायला हवी. मी बरीच वैयक्तिक बाब बाहेर येताना पाहिली आहे, यामुळे मुलांवर त्याचा परिणाम होतो.

अर्जुन कपूरला जेव्हा एका मुलाखतीमध्ये विचारले गेले कि तो मलाईकासोबत कधी लग्न करणार आहे तेव्हा त्याने म्हंटले कि त्यांची रिलेशनशिप सध्या जिथे आहे तिथे ते खुश आहे. सध्या कोरोनामुळे ते या वातावरणामध्ये लग्न करू इच्छित नाहीत. त्याचबरोबर त्याने हे देखील म्हंटले कि ते जेव्हा लग्न करणार आहेत तेव्हा ते सर्वांना सांगतील.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने