मराठी फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे यांनी आपल्या विनोदामुळे प्रेक्षकांच्या मनावर वर्चस्व गाजवले. मराठी चित्रपटामध्येच नाही तर हिंदी चित्रपटामध्ये देखील त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली. १६ डिसेंबर २००८ मध्ये त्यांनी या जगाचा निरोप घेतला. पण अभिनयाच्या मध्यमातून ते आजदेखील आपल्यामध्ये आहेत. खूप कमी लोकांना माहिती आहे कि लक्ष्मीकांत बेर्डे यांनी दोनवेळा संसार थाटला.

लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या दुसऱ्या पत्नी प्रिया बेर्डे यांच्याबद्दल सर्वांनाच माहिती आहे पण त्यांच्या दुसऱ्या पत्नीबद्दल खूपच कमी लोकांना माहिती आहे. लक्ष्मीकांत बेर्डे यांची पहिली पत्नी देखील एक अभिनेत्री होती. करियरच्या सुरुवातीला त्यांनी अनेक चित्रपट, नाटकांमध्ये काम केले. यादरम्यान त्यांनी कमाल माझ्या बायकोची या चित्रपटामध्ये काम केले. या चित्रपटामध्ये त्यांच्यासोबत अभिनेत्री रुहीने देखील काम केले.

या चित्रपटाच्या सेटवर दोघांची ओळख झाली. या चित्रपटामध्ये अलका कुबल यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पत्नीची भूमिका केली होती. पण ते अभिनेत्री रुहीच्या प्रेमात पडले. अभिनेत्री रुहीने मराठी चित्रपटासोबत हिंदी चित्रपटामध्ये देखील काम केले आहे.

लक्ष्मीकांत बेर्डे यांचे पहिले लग्न अभिनेत्री रुहीसोबत झाले होते पण त्यांचे हे लग्न जास्त काळ टिकले नाही. त्यानंतर लक्ष्मीकांत बेर्डे यांनी प्रिया बेर्डे सोबत लग्न केले. दोघांनी अनेक चित्रपटामध्ये एकत्र काम केले. दोघांना दोन मुले अभिनय आणि स्वानंदी आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने