लग्न हे एक पवित्र नाते मानले जाते. वेगवेगळ्या भागामध्ये लग्नाच्या वेगवेगळ्या प्रथा असतात. काही प्रथा तर इतक्या विचित्र असतात कि त्या जाणून घेतल्यानंतर हैराणी होते. विशेष म्हणजे नवरीला किंवा नवऱ्या मुलाला यामधून जावे लागते.

काही रूढी आणि प्रथा इतक्या कठोर असतात कि ज्याचे पालन नवरीला किंवा नवऱ्या मुलाला करावेच लागते. असे नाही केले तर त्यांना समाजामधून काढून टाकले जाते किंवा त्याला कठोरातली कठोर शिख केली जाते.

अशीच एक प्रथा बोराना समाजामध्ये पाहायला मिळते. हा समुदाय साऊथ अफ्रिका, इथोपिया आणि सोमालिया या भागामध्ये पाहायला मिळतो. या समाजामध्ये महिलांपेक्षा पुरुषांना अधिक महत्व दिले जाते. यामध्ये पुरुष गावामधील सर्व गोष्टींची काळजी घेतात. तर स्त्रिया घराची सजावट करतात आणि आपल्या परंपरेचे पालन करतात.

सर्वात विचित्र गोष्ट म्हणजे या समाजामध्ये लग्नानंतरच त्यांचे केस वाढवण्याची मुभा असते. या समाजामधील मुली आपल्याला एक चांगला जोडीदार मिळावा म्हणून लग्नाच्या अगोदर टक्कल करतात. असे केल्यामुळे आपल्याला चांगला जोडीदार मिळतो अशी यांची समज आहे. या समाजामध्ये ज्या मुलाचे सर्वात लांब केस आहेत त्याला खूप नशीबवान समजले जाते.

आता या समाजातील लोकांच्या विचारसरणीमध्ये थोडा थोडा बद्दल होत चालला आहे. जुन्या प्रथा सोडून हे लोक नवीन गोष्टी आणि विचार अमलात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तरीही या समाजामध्ये लोक आज देखील काही रूढी आणि परंपरा यांचे पालन करतात.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने