‘खिचड़ी’खूपच पॉपुलर सीरियल राहिली आहे ज्यामधील कलाकार दर्शकांना खूपच हसवत होते. आज देखील हा शो यू-ट्यूबवर पाहिला जातो. या कॉमेडी शोमध्ये प्रफुल, हंसा, बाबूजी आणि जयश्री सारखे प्रसिद्ध कलाकार पाहायला मिळाला होते. या शोमध्ये एक लहान मुलगी ‘चक्की’ची भूमिका साकारत होती. सिरीयलमध्ये चक्की घरातील सर्वात समजदार मुलगी होती. तथापि आता ती छोटी चक्की इतक्या वर्षामध्ये खूप मोठी आणि ग्लॅमरस बनली आहे.

खूपच सुंदर आणि ग्लॅमरस बनली आहे खिचडीची चक्की: ज्या मुलीने खिचडीमध्ये चक्कीची भूमिका केली होती तिचे खरे नाव ऋचा भद्र आहे. ऋचा आज मोठी झाली आहे आणि खूपच सुंदर दिसत आहे. खिचडीनंतर ऋचा ‘इंस्टेंट खिचड़ी’, ‘बा बहु और बेबी’, ‘मिसेस तेंदुलकर’ सारख्या शोमध्ये देखील पाहायला मिळाली.

टीव्हीवर सर्वांना हसवणारी चक्की खऱ्या आयुष्यामध्ये तितकीच फनी आहे. ऋचाला खाणे–पिणे खूप आवडते. ऋचा सोशल मिडियावर खूप सक्रिय राहते आणि तिचे हजारो फॉलोअर्स आहेत. लहानपणी तर ऋचा टीव्हीवर खूप सक्रीय होती पण मोठी झाल्यानंतर ती टीव्ही इंडस्ट्रीपासून दूर गेली आणि जेव्हा याबद्दल तिला विचारले गेले तेव्हा तिने हैराण करणारे उत्तर दिले.

म्हणाली मी तशी नाही जशा टीव्ही इंडस्ट्रीला मुली पाहिजेत: वास्तविक ऋचा म्हणाली, असे नाही कि मी पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला नाही पण बॉडी शेमिंग आणि कास्टिंग काउचमुळे मी यापासून दूर गेले. आता मी कॉर्पोरेट जगतामध्ये आपले करियर बनवण्याचा प्रयत्न करत आहे.

अभिनेत्री पुढे म्हणाली, टीव्हीवर रोमँटिक सीन्स करण्यास किंवा एक्सपोज करण्यास माझी फॅमिली कम्फ़र्टेबल नव्हती. मी कधीच सडपातळ नव्हते आणि सध्या टीव्ही इंडस्ट्रीला जशा मुली पाहिजेत मी तशी नाही. मी माझ्या फॅमिलीच्या विरुद्ध जाऊन काम करू शकत नव्हते.

कास्टिंग डायरेक्टरसोबत जुळवून घेतले नाही: तथापि कास्टिंग काउचवर प्रश्न विचारल्या नंतर ऋचा म्हणाली, मी कधीच कास्टिंग काउचचा सामना केला नाही. पण जेव्हा लग्नानंतर मी पुन्हा ऑडिशनला गेले तेव्हा अनेक ठिकाणी मला तडजोड करण्यास सांगितले गेले.

एका कास्टिंग डायरेक्टरने मला स्वतःला खुश करण्यासाठी देखील सांगितले. त्याची इच्छा होती कि मी त्याला हॉटेलमध्ये भेटावे. अशा घटनांनी मी खचून गेले. तर मी जी इमेज एक बालकलाकार म्हणून बनवली होती ती मला गमवायची नव्हती. कॉमेडी सीरियल ‘खिचड़ी’ २००० मध्ये सुरु झाली होती. या सिरीयलची पॉपुलरिटी इतकी जास्त होती कि यावर ‘खिचड़ी: द मूवी’ नावाचा चित्रपट देखील बनला होता.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने