बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमधील अभिनेत्री जुही चावलाने नुकताच एक खळबळजनक खुलासा केला आहे. जुहीने हा खुलासा झी कॉमेडी शोच्या सेटवर शुटींगदरम्यान केला आहे. ज्यामध्ये ती एक पाहुणी कलाकार म्हणून पाहायला मिळणार आहे.

अभिनेत्री जुही चावला म्हणाली कि जेव्हा कधी आमच्या घरी पार्टी असते तेव्हा आम्ही नेहमी शाहरुख खानला निमंत्रण देतो. अशाच एका पार्टीच्या वेळी मी त्याला फोन केला आणि त्याला निमंत्रण दिले. दरम्यान सर्वजण उत्सुक होते कि शाहरुख खान पार्टीला येणार आहे. माझा सर्व स्टाफ त्याची आतुरतेने वाट पाहत होता.

जुही पुढे म्हणाली कि मी त्याला रात्री ११ वाजेपर्यंत येण्यास सांगितले होते. यावर शाहरुख म्हणाला कि मला थोडा येण्यास उशीर होईल. पण इतका उशीर होईल हे सांगितले नव्हते. तो रात्री तब्बल २.३० वाजता आला. त्याची वाट पाहून माझा सर्व स्टाफ निघून गेला होता आणि मी झोपले होते. जेवण देखील संपले होते.

शाहरुखच्या उशिरा येण्याच्या सवयीवर बोलताना फराह खानने एक मजेशीर सल्ला दिला, ती म्हणाली कि मला वाटते कि जर तुला उशिरा यायचे असेल तर नेहमीची उशीर करत जा. सध्या जुही चावला झी कॉमेडी शोमध्ये एक गेस्ट म्हणून पाहायला मिळणार आहे. नुकतेच या शोचे शुटींग पूर्ण झाले असून. लवकरच झी टीव्हीवर याचे प्रसारण होणार आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने