आपल्या देशाचे एक वैशिष्ट्य म्हणजे हे संघर्षपूर्ण गोष्टींनी भरलेले आहे. प्रत्येक गाव प्रत्येक शहरामध्ये असे तरुण-तरुणी आहेत ज्यांनी आव्हाने स्वीकारून सफलता मिळवली. आज अनेक महिला विमाने उडवत आहेत तर कोणी डॉक्टर आहे. फक्त इतकेच नाही तर देशाच्या संरक्षणामध्ये देखील महिला महत्वाची भूमिका पार पाडत आहेत. अशीच एक स्टोरी एका तरुणीची आहे जिचे नाव अनिता शर्मा आहे. जी आपल्या मेहनतीच्या बळावर सफल झाली.

एक काळ असा होता जेव्हा अनिता संघर्षपूर्ण आयुष्य जगत होती आणि समोर कोणताही मार्ग दिसत नव्हता. १७ व्या वर्षी तिचे लग्न २७ वर्षीय व्यक्तीसोबत झाले होते आणि तिला गंभीर आर्थिक तंगीचा सामना करावा लागला होता. पण तिच्यामध्ये काहीतरी करण्याची जिद्द होती तिला आपले ध्येय गाठायचे होते. अनिताने जीवनामध्ये पुढे जाण्याच्या निर्णय घेतला आणि तिने घटस्फोट घेतला. तथापि घटस्फोट घेण्यामागे तिची आव्हाने नव्हती तर पतीच्या वयाचे अंतर आणि आपले सामंजस्य होते.

कुटुंबीयांनी परंपरेमुळे अल्पवयामध्येच तिचे लग्न करून दिले पण अनिताने आपले शिक्षण सुरु ठेवले. तिने पदीचे शिक्षण देखील पूर्ण केले आणि सरकारी परीक्षेची तयारी सुरु केली. तथापि पदवीची तिसऱ्या वर्षाची परीक्षा देताना तिच्या पतीचा अ’पघात झाला आणि तिला शिक्षणामध्ये ब्रेक घ्यावा लागला. यादरम्यान तिने बँकेची परीक्षा देखील पास केली पण ३ वर्षामध्ये पदवी पूर्ण न करू शकल्यामुळे तिला हि संधी मिळाली नाही. जेव्हा आयुष्यामध्ये काहीतरी करण्याचा निश्चय केला तर त्यामध्ये नशीब देखील आडवे येत नाही.

पतीच्या अपघातानंतर घरची जबाबदारी अनितावर आली तिने क्रॅश कोर्स केला आणि पार्लरमध्ये काम करून घर चालवू लागली. यासोबत तिने वनविभागाच्या परीक्षेची तयारी देखील केली. अनिताची मेहनत सफल झाली तिने ४ तासामध्ये १४ किलोमीटर पायी चालून वनविभागाची परीक्षा पास केली आणि २०१३ मध्ये बालाघाटमध्ये तिला पहिली पोस्टिंग मिळाली.

पण अनिताचा स्वभाग इथपर्यंत थांबण्याचा नव्हता. वनरक्षक बनल्यानंतर तिने सब इंस्पेक्टरच्या परीक्षेची तयारी केली पण तिच्या नशिबामध्ये एक शिपाई नाही तर प्रशाशक बनणे लिहिले होते. ती एसआईसोबत मध्य प्रदेश लोक सेवा आयोग परीक्षेची तयारी करू लागली.

सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे इतका संघर्ष करून अनिता पहिल्याच प्रयत्नात लोक सेवा आयोगाच्या परीक्षेत १७ रँकवर आली. तर सर्व कॅटेगरीमध्ये तिची रँक ४७ होती. ते म्हणतात न काही मिळवायचे असेल तर ते थांबत नाही.

अनिता इथे देखील थांबली नाही आणि उपजिल्हाधिकारी पद मिळवण्यासाठी तिने तयारी सुरु केली आणि २०१६ मध्ये तिने ती देखील परीक्षा पास केली. सध्या ती डीएसपी पदावर कार्यरत आहे. अनिता एक उदाहरण आहे कि कसे आव्हानांना न घाबरता आपल्या ध्येयासाठी मेहनत केली तर सफलता जरूर मिळते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने