पॉप्युलर टीवी शो ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मध्ये दयाबेनची भूमिका करणारी अभिनेत्री दिशा वकानी भलेहि अभिनयापासून दूर आहे पण तिचे चाहते तिला खूप मिस करत आहेत. दिशाचे चाहते या प्रतीक्षेत आहेत कि ती कधी पुन्हा ‘तारक मेहता’मध्ये परतणार आहे.

यादरम्यान दिशा वकानीचा एक डांस व्हिडीओ सध्या मिडियावर व्हायरल आहे. ज्याने सोशल मिडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. दिशा वकानी या व्हिडीओमध्ये ‘दरिया किनारे एक बंगलो’ गाण्यावर हॉट डांस करताना पाहायला मिळत आहे.

चाहते देखील दयाबेन दिशा वकानीचे हे रूप पाहून हैराण झाले आहेत. चाहते तिचे कौतुक करत आहेत कि दिशा वकानीने कशाप्रकारे करियरमध्ये पुढे जाण्यासाठी स्ट्रगल केला आहे. दिशा वकानी या गाण्यामध्ये मच्छीमारांबरोबर डांस करताना दिसत आहे. दिशा वकानीने गुजराती थियेटरमधून आपल्या करियरची सुरुवात केली होती. ती देवदास आणि जोधा अकबर सारख्या चित्रपटांमध्ये देखील पाहायला मिळाली होती.

२००८ मध्ये दिशा वकांनीने ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ साईन केले आणि दयाबेन म्हणून तिला खूप प्रसिद्धी मिळाली. या भूमिकेमुळे दिशा वकांनीने प्रेक्षकांच्या मनामध्ये अशी छाप सोडली कि प्रेक्षक अजूनदेखील तिची आतुरतेने वाट पाहत आहेत. तिच्या भूमिकेसाठी अजूनदेखील कोणत्याही अभिनेत्रीला साईन केले गेले नाही.

पहा व्हिडीओ:

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने