बॉलीवूड अभिनेत्री आणि खेळाडू यांच्यामधील रिलेशन काही नवीन गोष्ट नाही, अनेक अभिनेत्री आणि क्रिकेटपटू हे आज एक चांगले वैवाहिक आयुष्य जगत आहेत. पण अशी काही रिलेशनशिप आहेत जी पूर्ण झालेली नाहीत. पण त्यांच्या चर्चा मात्र मोठ्या प्रमाणात झाल्या होत्या. अशी एक बातमी आली होती जी बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोन आणि धोनीच्या रिलेशनबद्दल होती.

यादरम्यान दीपिकाला मिस धोनी देखील संबोधले जात होते. दीपिका आणि धोनी आपल्याला एकत्र रॅम्प वॉक करताना देखील पाहायला मिळाले होते. यानंतर त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा मोठ्या प्रमाणात झाल्या होत्या. याअगोदर धोनीचे नाव अनेक सुंदरींशी जोडले जात होते.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी -20 मालिकेदरम्यान दीपिका धोनीला प्रोत्साहन देताना देखील पाहायला मिळाली होती. विशेष म्हणजे धोनीने सामना पाहण्यासाठी दीपिकाला आमंत्रण दिले होते. त्यावेळी धोनीने आपली हेयर स्टाईल देखील बदलली होती. असे म्हंटले जाते कि दीपिकाच्या सांगण्यावरून त्याने असे केले होते कारण दीपिकाला त्याची लांब केस असलेली हेयर स्टाईल आवडत नव्हती.

धोनीशिवाय दीपिकाचे नाव युवराज सिंह सोबत देखील जोडले गेले. अशा चर्चा समोर आल्या होत्या कि युवराज सिंग सोबतच्या नात्यामुळे धोनी दीपिकापासून दूर गेला होता. अनेक मुलाखती दरम्यान धोनीला या रिलेशनशिप बद्दल विचारण्यात आले पण त्याने कधीही यावर शिक्कामोर्तब केले नाही. उलट त्याने उत्तर दिले होते कि प्रसारमाध्यमे आम्हाला एकत्र पाहिल्यानंतर अशी उलट-सुलट बातमी देत आहेत.

सध्या धोनी आपल्या वैवाहिक आयुष्यामध्ये खुश आहे. पत्नी साक्षीसोबत तो आपले वैवाहिक आयुष्य आनंदाने घालवत आहे. दोघांना एक गोड मुलगी देखील आहे. धोनी क्रिकेट मधून निवृत्त झाला असला तरी आता बीसीसीआयने धोनीवर एक मोठी जबाबदारी सोपवली आहे. त्याची दुबई येथे होणाऱ्या टी -20 विश्वचषकासाठी भारतीय संघाचा मार्गदर्शक निवड करण्यात आली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने