उत्तर प्रदेशमध्ये मथुरा सीमेवरील अछनेरा जनपद आगरामध्ये एक छोटे गाव आहे रैपुरा अहीर. इथे या गावाची एक विशेष ओळख आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये हार न मानणे, कोणत्याही परिस्थितीमध्ये शिक्षण मिळवणे आणि सफलता मिळवणे. यावरूनच अंदाज लावा कि लहानपणी वडिलांना गमवल्यानंतर पाच सख्ये भाऊ-बहिण उत्तर प्रदेश पोलिसात कॉन्स्टेबल बनले.

एक बहिण कॉन्स्टेबल सोडून शिक्षक झाली: हे उत्तर प्रदेशातील निवडक कुटुंबापैकी एक आहे, ज्यांच्या मुलांनी अत्यंत गरिबी पाहिली आणि रात्रीचे दिवस केले. नंतर एकमेकांच्या पावलावर पाऊल ठेऊन चार बहिणी एका भावाने पोलीस जॉईन केले. यामधील एक बहिण आता पोलीस कॉन्स्टेबलचा राजीनामा देऊन शिक्षिका बनली आहे.

यूपी पोलीस कॉन्स्टेबल भाऊ-बहिण: यूपी पोलीस कॉन्स्टेबल भाऊ-बहिणीमध्ये मोठी बहिण सुनिताने आपल्या कुटुंबाच्या संघर्षाबद्दल आणि सफलताबद्दल मुलाखत दिली. त्यांची हि सगळी स्टोरी खूपच त्यांच्यासाठी प्रेरणादायी आहे जे वडिलांची सावली डोक्यावरून निघून गेल्यानंतर स्वतःच्या नशिबाला दोष देत बसतात.

सुनीता कॉन्स्टेबल, पोलीस लाईन बरेली: पोलीस कॉन्स्टेबल भावंडांमधील सर्वात पहिला सुनिताने २०१६ मध्ये कॉन्स्टेबल भरती परीक्षा पास केली. बीबीए पर्यंत शिक्षण घेतलेली सुनिता बरेली जिल्ह्यातील किला पोलीस ठाण्यात तैनात होती. सध्या ती बरेली पोलीस लाईन्समध्ये सेवेत आहे.

रंजिता: पहिले कॉन्स्टेबल आता शिक्षक: बीएड आणि बीएससीची डिग्री घेणारी दुसरी रंजिता आपल्या दोन लहान बहिणी कुंति आणि अंजलिसोबत यूपी पोलीस कॉन्स्टेबल भरती २०१९ पास झाली. रंजिताला यूपीच्या मालवा पोलीस ठाण्यात पोस्टिंग मिळाली. पोलीस कॉन्स्टेबल बनल्यानंतर देखील ती स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती. नुकतीच तिची निवड शिक्षक भरतीमध्ये झाली. त्यानंतर तिने पोलीस कॉन्स्टेबल पदाचा राजीनामा दिला. सध्या ती शिक्षिकेचे प्रशिक्षण घेत आहे.

अंजली आणि कुंती कॉन्स्टेबल, हुसैनगंज: तिसरी आणि चौथी बहिण अंजली आणि कुंती आपल्या मोठ्या बहिणीच्या पावलावर पाऊल ठेऊन यूपी पोलीस कॉन्स्टेबल भरती परीक्षा २०१९ पास झाल्या. अंजलीने इंटर आणि कुंतीने बीए प्रथम वर्ष पर्यंत शिक्षण घेतले. दोघी बहिणी सध्या फतेहपुर जिल्ह्याच्या हुसैनगंज ठाण्यात सेवेत आहेत.

धीरज, पीएसीमध्ये प्रशिक्षण: चार बहिणींशिवाय नुकतेच त्यांचा भाऊ धीरज देखील सफल झाला आहे. त्याची पीएसीमध्ये कांस्टेबल पदासाठी निवड झाली आहे. सध्या तो पीएसीचे प्रशिक्षण घेत आहे. धीरजने बीए द्वितीय वर्षामध्ये सफलता मिळवली आहे.

वडिलांचा अ’प’घा’ती मृ’त्यू: सुनिता म्हणते कि त्यांनी लहानपणीची आपल्या वडिलांना गमवले. २००२ मध्ये वीरेंद्र सिंह यांचा मथुरामधील एका रस्ते अ’प’घा’ता’त मृ’त्यू झाला. त्यांच्या मृ’त्यू’ची बातमी कुटुंबियांना एका आठवड्यानंतर मिळाली. एका वर्तमानपत्रात छापलेल्या बातमीमुळे त्यांची ओळख पटली.

आई मछला देवी खंबीरपणे उभी राहिली: पतीच्या मृ’त्यू’नं’त’र आई मछला देवीने सात मुलांना सांभाळले. त्यावेळी सर्वात लहान मुलगी अंजली फक्त १० महिन्याची होती. सुनिता आठ वर्षे, रजिता सहा वर्षे, कुंती, दोन वर्षे, धीरज चार वर्षे, दुसरा भाऊ सुधीर कुमार १४ वर्षाचा होता. सर्वात मोठी बहिण शशीचे लग्न झाले होते.

जनावरे सांभाळून आणि शेती करून मुलांना शिकवले: सुनिता सांगते कि त्यांची थोडी शेती आहे. त्याचबरोबर वडिलांच्या मृ’त्यू’नं’त’र आम्ही जनावरे पाळू लागलो. जनावरे आणि शेतीद्वारे मछला देवीने मुलांना शिकवले आणि सफल बनवले. सुनिता आणि तिच्या बहिणी आपल्या आईला आपली ताकद मानतात.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने