स्वप्न शास्त्रानुसार स्वप्ने नेहमी काही चांगले तर काही वाईट संकेत देतात. व्यक्तीला अनेक प्रकारची स्वप्ने दिसतात. जसे पाणी, आग, साप, जनावरे, महिला, पुरुष, मुले, आत्मा, डोंगर, मंदिर, देव इत्यादी. प्रत्येक स्वप्नाचा अर्थ वेगळा असतो. स्वप्नांला भविष्यामध्ये घडणाऱ्या घटनांसोबत जोडले जाते. इथे आपण अशाच काही स्वप्नांबद्दल जाणून घेणार आहोत.

जर स्वप्नामध्ये वरात दिसली तर याचा अर्थ असा होतो कि भविष्यामध्ये चिंता आणि समस्यांचा सामना करावा लागू शकतो. जर तुम्ही स्वताला वर किंवा वधू बनलेले पाहत असाल तर हे देखील अशुभ संकेत आहेत. अशी स्वप्ने मृत्यूसमान कष्ट मिळण्याचे संकेत देतात.

जर स्वप्नामध्ये तुम्ही एखादे झाड तोडताना पाहता तर याचा अर्थ असा होतो कि तुम्हाला धन हानी होणार आहे. अशी स्वप्ने कुटुंबामध्ये एखाद्या वडिलधाऱ्या व्यक्तीची तब्येत खराब होण्याचे देखील संकेत देतात. जर तुम्ही स्वप्नामध्ये स्वताला उंचावरून पडताना पाहत असाल तर याचा अर्थ असा होतो कि तुमच्या आरोग्यामध्ये देखील घसरण होऊ शकते. असे स्वप्न मान-प्रतिष्ठेचे नुकसान होण्याचे देखील संकेत मानले जाते.

स्वप्नामध्ये काळी मांजर पाहणे देखील अशुभ संकेत मानले गेले आहे. हे स्वप्न मानसिक ताण असण्याचे देखील संकेत देते. स्वप्नामध्ये बंद दरवाजा पाहणे करियरमध्ये समस्या येण्याचे संकेत आहे. असे स्वप्न पाहिल्यानंतर सावध झाले पाहिजे. स्वप्नामध्ये स्वतःला केस कापताना पाहणे देखील अशुभ मानले जाते. स्वप्नामध्ये स्वतःला मोठ-मोठ्याने हसताना पाहणे देखील अशुभ मानले जाते.

स्वप्नामध्ये घुबड पाहणे देखील अशुभ संकेत मानले गेले आहे. हे स्वप्न भविष्यामध्ये एखादा गंभीर आजार होण्याचे संकेत देते. स्वप्नामध्ये स्वतःला वाळवंटात चालताना पाहणे देखील एक अशुभ संकेत आहे. हे स्वप्न शत्रूंपासून तुम्हाला कष्ट मिळण्याचे संकेत देते.

स्वप्नामध्ये डॉक्टरला पाहणे देखील अशुभ मानले गेले आहे. हे स्वप्न देखील एखादा आजार होण्याचे संकेत देते. स्वप्नामध्ये गाढव पाहणे मृत्यु तुल्य कष्ट मिळण्याचे संकेत मानले गेले आहे. स्वप्नामध्ये झाडू पाहणे धन हानी होण्याचे संकेत देते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने