अभिनेता अनिल कपूर बॉलीवूडचा यंग अभिनेता म्हणून ओळखला जातो. वयाच्या ६४ व्या वर्षीदेखील ते दिव्सामधून चार-चार तास वर्कआउट करतात. काही दिवसांपूर्वी अनिल कपूर अरबाज खानचा शो पिंच २ मध्ये आला होता. शोमध्ये अरबाज खानने अनिल कपूरला विचित्र प्रश्न विचारले तर अनिल कपूरने मजेशीर प्रतिउत्तरे दिली.

शोदरम्यान अरबाज खानने अनिल कपूरला काही व्हिडीओ देखील दाखवले. ज्यामध्ये अनिल कपूरच्या लुकवर अनेक लोकांनी विचित्र कमेंट केल्या होत्या. एका व्यक्तीने कमेंट केली आहे कि अनिल कपूर यांना वरदान भेटले आहे ज्यामुळे ते नेहमी चिरतरुण राहतात. तर एकाने लिहिले आहे कि अनिल कपूर नेहमी आपल्या सोबत एक प्लास्टीक सर्जन ठेवतात आणि तरुण राहण्यासाठी सापाचे रक्त पितात.

शोदरम्यान अरबाज खानने अनिल कपूरला पत्नी आणि मुलीबद्दलचे ट्रोल देखील दाखवले. एका चाहत्याने लिहिले होते कि अनिल कपूर आणि त्याची मुलगी रिया कपूर पैशांसाठी काहीही करू शकतात. यावर अनिल कपूरने म्हंटले कि जर आपल्याला काही माहिती नसेल तर यावर आपले मत व्यक्त करू नये. एका व्यक्तीने लिहिले आहे कि ज्यांच्याकडे अमाप पैसा असतो त्यांना लाज वाटत नाही तर ज्यांना लाज वाटते त्यांच्याकडे काहीच पैसा नसतो.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने