बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारच्या आईचे निधन झाले आहे. याची माहिती स्वतः अक्षय कुमारने आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरून दिली. अक्षयची आई अरुणा भाटीया बऱ्याच दिवसांपासून आजारी होती आणि मुंबईच्या हीरानंदानी हॉस्पिटलमध्ये आईसीयूमध्ये भरती होती. अरुणा भाटीयाच्या निधनावर सेलेब्स शोक व्यक्त करत आहेत.

अक्षय कुमारने दुखी अंत:करणाने पोस्ट शेयर करत लिहिले आहे कि, आज मी असह्य दुख सहन करत आहे. ती माझा एक महत्वाचा भाग होती. माझी आई श्रीमती अरुणा भाटीया शांतीपूर्वक या जगाला सोडून माझ्या वडिलांना भेटायला गेली आहे. मी तुमच्या प्रार्थनेचा सन्मान करतो कारण मी आणि माझे कुटुंब यातून जात आहे. ओम शांती.

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने दुख व्यक्त करत एक एमोजी शेयर केला. त्याचबरोबर प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा याने देखील अक्षयच्या आईच्या निधनावर दुख व्यक्त केले आहे. फिटनेस एक्सपर्ट दीक्षा मलिकने देखील अक्षय कुमारला या वाईट काळामध्ये मजबूत राहण्यास सांगितले आहे.

अक्षय कुमारला जेव्हा आपल्या आईच्या तब्येतीची माहिती मिळाली तेव्हा तो यूके वरून आपला चित्रपट सिंड्रेलाची शुटींग सोडून भारतामध्ये परत आला होता. अक्षय आपल्या आईवर खूप प्रेम करत होता. यामुळे त्याने शुटींग मध्येच सोडून भारतामध्ये परतण्याचा निर्णय घेतला होता पण आता त्याची आई या जगामध्ये नाही.

अक्षय कुमारचा आज वाढदिवस आहे पण त्याची आई वाढदिवसाच्या ठीक एक दिवस अगोदर त्याला सोडून निघून गेली. अक्षयसाठी त्याची आई सर्वकाही होती. आईच्या निधनामुळे त्याच्यावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

अरुणा भाटीया ७७ वर्षांच्या होत्या आणि काही वर्षांपूर्वी त्यांच्या गुडघ्याची सर्जरी झाली होती. अरुणा भाटीया चित्रपट प्रोड्यूसर राहिली आहे आणि त्यांनी अनेक चित्रपट प्रोड्यूस केले आहे. ज्यामध्ये हॉलीडे, नाम शबाना आणि रुस्तम सारखे चित्रपट आहेत. अक्षयच्या वडिलांचे खूप आधी निधन झाले आहे. त्याच्या कुटुंबामध्ये त्याची एक बहिण देखील आहे जी लाईमलाईट पासून दूर राहते.

आईला घेऊन गेला होता कसिनोमध्ये: वास्तविक अरुणा भाटीया यांना एकदा कॅसिनोला जायचे होते आणि अक्षयने त्यांची हि इच्छा पूर्ण केली होती. तो आपल्या आईला त्यांच्या वाढदिवशी व्हेकेशनवर सिंगापूरला घेऊन गेला होता आणि तिथे त्याने कसिनो देखील दाखवले होते. अक्षयने या ट्रीपचा एक व्हिडीओ शेयर करत लिहिले होते कि जे चांगले वाटेल ते काम लाईफमध्ये अनेक वेळा करावे आणि या बर्थडे गर्लने असे केले आहे. आईसोबत त्याने एक आठवडा सिंगापूरमध्ये घालवला आणि त्याने त्यांची फेवरेट जागा देखील दाखवली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने