बिग बॉस ओटीटी फेम उर्फी जावेद गेल्या काही दिवसांपासून नेहमी चर्चेमध्ये येत आहे. कारण देखील काही तसेच आहे. तिच्या विचित्र पेहरावामुळे ती चर्चेमध्ये येत आहे. काही दिवसांपूर्वी ती विचित्र पेहरावामध्ये एअरपोर्टवर स्पॉट झाली होती. ज्यामुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. तिने चक्क अर्ध्या टी-शर्टचे जॅकेट घातले होते ज्यामुळे तिची ब्रा स्पष्टपणे दिसत होती. यामुळे तिला लोकांनी खूपच ट्रोल केले होते.

आता हीच अभिनेत्री पुन्हा एकदा आपल्या कपड्यांमुळे चर्चेमध्ये आली आहे. पण यावेळी तिने काही वेगळेच केले आहे. तिने चक्क पायमोजांचा क्रॉप टॉप परिधान केला आहे आणि त्यावर तिने अर्धाच टी-शर्टचं जॅकेट घातल आहे. तिची हि विचित्र फॅशन पाहून लोक देखील थक्क झाले आहेत.

या पेहरावामध्ये अभिनेत्री उर्फीने आपले काही फोटो आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवर शेयर केले आहेत. फोटो शेयर करत तिने हे देखील सांगितले कि मी माझा क्रॉप टॉप पायमोज्यांपासून बनवला आहे तर टी शर्ट अर्धे कापून त्याचे जॅकेट बनवले आहे.

या पेहरावामधील तिचा एक व्हिडीओ देखील सोशल मिडिया तुफान व्हायरल झाला आहे. ज्यामुळे लोक तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल करत आहेत. लक्ष वेधून घेण्यासाठी लोक काय काय करतील अशा कमेंट देखील लोकांनी केल्या आहेत.

तर काहींनी दिदीचा काही प्रॉब्लेम आहे ज्यामुळे तिला अर्धेच कपडे घालावे लागतात अशा देखील कमेंट केल्या आहेत. अभिनेत्री उर्फी सोशल मिडियावर खूपच अॅलक्टिव असते आणि ती नेहमी आपले बोल्ड फोटो शेयर करत राहते. उर्फी जावेदने बिग बॉस ओटीटीमध्ये खूपच चांगली एंट्री घेतली होती. पण अवघ्या ८ व्या दिवशीच तिला घरातून बाहेर जावे लागले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने