१९८९ मध्ये आलेल्या मैने प्यार किया चित्रपटाने भाग्यश्रीला अमाप प्रसिद्धी मिळवून दिली. चित्रपटामधील तिची सुमनची भूमिका दर्शकांना खूपच आवडली होती. भाग्यश्रीचा हा पहिलाच चित्रपट होता. या चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगला धुमाकूळ घातला होता. पण यानंतर भाग्यश्रीला चांगले चित्रपट मिळाले नाहीत. तिचे कैद में बुलबुल, त्यागी, पायल सारखे चित्रपट सुपरफ्लॉप ठरले. यानंतर भाग्यश्रीने हिमालय दासानी सोबत लग्न केले आणि ती चित्रपटांपासून दूर गेली.

मैने प्यार किया चित्रपटाद्वारे चर्चेमध्ये आलेल्या अभिनेत्री भाग्यश्रीने एकेकाळी दर्शकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. पण अचानक ती बॉलीवूडमधील गायब झाली. भाग्यश्रीने २३ वर्षानंतर फिल्मी जगतामध्ये कमबॅक केले. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या थलायवी चित्रपटामध्ये ती पाहायला मिळाली. 

या चित्रपटामध्ये कंगना रनौत मुख्य भूमिकेमध्ये आहे. भाग्यश्री सोशल मिडियावर देखील खूपच सक्रीय राहते. नुकतेच तिचे काही फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत ज्यामध्ये ती बिकिनीमध्ये पाहायला मिळत आहे. या फोटोमुळे भाग्यश्री पुन्हा चर्चेमध्ये आली आहे. ५२ वर्षाच्या भाग्यश्रीने स्विम सूटमध्ये दिलेल्या पोझमुळे चाहते देखील थक्क झाले आहेत.

मैने प्यार किया चित्रपटाच्या वेळी भाग्यश्रीचे वय अवघे १९-२० वर्षे होते. या चित्रपटामुळे ती एका रात्रीमध्ये स्टार बनली होती. प्रसिद्धी शिखरावर असताना तिने हिमालय दासानी सोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. यानंतर तिने काही चित्रपट केले पण ते चित्रपट फ्लॉप झाले. यानंतर ती फिल्म इंडस्ट्रीपासून दूर झाली. भाग्यश्री सध्या दोन मुलांची आई आहे. ५२ वर्षाची असून देखील भाग्यश्री फिट आणि स्लिम दिसते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने