या जगामध्ये आईची तुलना ईश्वरासोबत केली जाते. यामागे हे कारण आहे कि आई आपल्या मुलांचे कष्ट कधी सहण करत नाही. ते कष्ट दूर करण्यासाठी ती अनेक प्रयत्न करते. सोशल मिडियावर एक बातमी तुफान व्हायरल होत आहे. बातमीनुसार एका आईने आपल्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी आपल्या मुलीच्या मुलीला जन्म दिला आहे.

जेव्हा आईला माहिती झाले कि तिची मुलगी बाळाला जन्म देण्यास असमर्थ आहे आणि तिचा जीव देखील जाऊ शकतो तेव्हा तिने हा निर्णय घेतला. आता तिने आपल्या नातीला जन्म दिला आहे. आजीने आपल्या नातीला जन्म देऊन सिद्ध केले आहे कि आई आपल्या मुलांच्या भल्यासाठी काहीही करू शकते. हे प्रकरण ब्राजिलच्या सेंट कटरीना शहरातील आहे.

इथे ५३ वर्षाची रोजिकलिया डी एब्रू कार्सेमने आपल्या मुलीच्या मुलीला जन्म दिला आहे. जेव्हा हि बातमी लोकांना माहिती झाले तेव्हा लोक देखील हैराण झाले. सोशल मिडियावर हि बातमी चर्चेचा विषय बनली आहे.

मुलीच्या आजारामुळे घेतला निर्णय: रोजिकलिया डी एब्रु कार्सेमची २९ वर्षाची मुलगी आहे जिला २०१४ मध्ये पल्मनरी एम्बॉलिज्म नावाचा आजार झाला. या आजारामध्ये रक्ताच्या गुठळ्या होतात. अशामध्ये डॉक्टर प्रेग्नंसी पासून दूर राहण्याचा सल्ला देतात. जर रोजिकलियाची मुलगी प्रेग्नंट झाली तर तिला धोका होता. जेव्हा याबद्दल तिच्या आईला समजले तेव्हा तिने एक निर्णय घेतला जे एक मोठे उदाहरण आहे.

आपल्या या निर्णयावर रोसिकलियाने म्हंटले कि हे तिच्या मुलीप्रती प्रेम आहे. आपल्या मुलीला प्रोत्साहन देण्यासाठी तिने हा निर्णय घेतला आहे. रोसिकलियाने म्हंटले कि माझे सौभाग्य आहे कि माझ्या पोटी माझ्या नातीचा जन्म झाला आहे.

रोसिकलियाच्या मुलीचे नाव इन्ग्रिड आहे आणि तिच्या पतीचे नाव फैबिआना आहे. दोघे आपल्याला मुलगी झाली म्हणून खूप खुश आहेत. IVF तंत्राच्या मदतीने मुलीचा जन्म झाला आहे. यामध्ये जवळ जवळ ५ लाख रुपये खर्च आला, जे क्राउडफंडिंगद्वारे उभारण्यात आले आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने