बॉलीवूडच्या जगतामध्ये अशी अनेक नावे आहेत जे काळाबरोबर विस्मृतीत गेले. एकेकाळी फिल्म इंडस्ट्रीमध्ये फेमस झालेले हे स्टार्स अचानक प्रसिद्धीपासून दूर झाले. या लिस्टमध्ये सामील आहे बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री तब्बूची मोठी बहिण फराह नाज.

अनेक चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर देखील फराहला तिच्या बहिणीसारखी सफलता मिळू शकली नाही. फराहचे सौंदर्य त्याकाळी खूप चर्चेमध्ये राहत होते. सौंदर्याच्या बाबतीत ती तब्बूपेक्षा देखील पुढे होती पण फिल्मी जगतामध्ये ती जम बसवू शकली नाही.

फराहने ८० आणि ९० च्या दशकामध्ये अनेक चित्रपट केले यामध्ये यतीम, फासले, काला बाज़ार आणि हलचलसारखे चित्रपट सामील आहेत. मोठ-मोठ्या स्टार्ससोबत काम केलेल्या फराहला बॉलीवूडमध्ये आपले स्थान निर्माण करता आले नाही. तुम्हाला माहिती आहे का कि फराह बॉलीवूडचा दिग्गज अभिनेता दारा सिंहची सून देखील राहिली आहे.


होय अभिनेत्रीने १९९६ मध्ये दारा सिंहचा मुलगा बिंदू दारा सिंहसोबत लग्न केले होते. या लग्नापासून दोघांना एक मुलगा फतेह रंधवा झाला पण त्यांचे हे नाते यशस्वी होऊ शकले नाही आणि नंतर २००२ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.

विशेष म्हणजे बिंदूसोबत घटस्फोट घेतल्यानंतर अवघ्या एका वर्षामध्येच फराहने अभिनेता सुमित सहगलसोबत देखील लग्न केले. आजच्या काळामध्ये फराहला ओळखणे खूप कठीण आहे. ती पूर्णपणे बदलली आहे. फिल्मी जगतापासून दूर ती आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने