श्रावण महिना हा महादेवाचा महिना समजला जातो. या महिन्यामध्ये शिव भक्त भोलेनाथाला प्रसन्न करण्यासाठी प्रयत्न करत असतो. श्रावण महिन्यामध्ये महादेवासोबत माता पार्वतीची देखील पूजा केली जाते. अशी मान्यता आहे कि या महिन्यामध्ये शिव-पार्वतीची पूजा केल्यास प्रत्येक मनोकामना पूर्ण होते. यासोबत दुख आणि समस्या देखील दूर होतात.

श्रावण महिन्यामध्ये महिला जास्त अॅक्टिव राहतात. यामध्ये विवाहित महिला महादेवाला प्रसन्न करण्यासाठी अधिक प्रयत्न करतात. त्या महादेवाकडे आपल्या पती आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना करतात. अशामध्ये या महिन्यामध्ये जर महिलांनी काही विशेष कामे केली तर त्यांना अत्यधिक लाभ मिळतो.

या कामांमुळे महादेवासोबत माता पार्वती देखील प्रसन्न होते आणि महिलांना अखंड सौभाग्य प्रदान करते. चला तर कोणताही विलंब न करता जाणून घेऊया कि महिलांनी श्रावण महिन्यामध्ये कोणकोणती कामे करायला हवीत.

श्रावण महिन्यामध्ये महिलांनी दररोज सकाळी सुर्योदयापूर्वी उठून स्नान करावे. यानंतर स्वच्छ कपडे घालावीत आणि शिवलिंगाला जल अर्पण करावे. असे केल्याने महादेव आणि माता पार्वती दोघेही प्रसन्न होतील आणि त्यांची कृपा दृष्टी देखील मिळेल. हे काम महिलांसोबत पुरुष देखील करू शकतात.

श्रावण महिन्यामध्ये सगळीकडे हिरवळ पसरलेली असते अशामध्ये या महिन्यामध्ये महिलांनी आपल्या हातामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या देखील घालाव्यात. असे केल्याने माता पार्वती प्रसन्न होते. ती आपल्या जीवनामध्ये खुशहाली आणि हिरवळ घेऊन येते. यामुळे श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी हिरवा चुडा अवश्य घालावा.

श्रावण महिन्यामध्ये महिलांनी १६ शृंगाराच्या वस्तू माता पार्वतीला अवश्य चढवाव्यात. यासोबत या महिन्यामध्ये दान करण्याचे देखील विशेष महत्व आहे. असे केल्याने माता पार्वती प्रसन्न होते आणि भक्तांना अखंड सौभाग्य प्रदान करते. इतकेच नाही तर या उपायाने आपल्या पतीचे आयुष्यही दीर्घ होते. श्रावण महिन्यामध्ये मेहंदी जरूर लावावी. हे खूपच शुभ असते. यामुळे याला श्रावण महिन्यामध्ये कमीत कमी एकदा तरी अवश्य लावावे.

श्रावण महिन्यामध्ये महिलांनी महादेवाचे भजन देखील गायले पाहिजे. भजन गायल्याने मन शांत राहते आणि मनामध्ये सकारात्मक विचार येतात. यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा देखील वाढते. जर या वातावरणामध्ये देवाची पूजा केली तर त्यांना खूपच आवडते. यामुळे श्रावण महिन्यामध्ये भजन गावून महादेव आणि पार्वती दोघांचीची कृपा दृष्टी मिळवली जाऊ शकते.

श्रावण महिन्यामध्ये भांडणतंटे आणि  रागापासून दूर राहावे. हा महिना खूप आनंदाचा असतो. याला हसत हसत आणि प्रेमाने घालवले पाहिजे. जर एखाद्या कारणामुळे राग आला तर ओम नम: शिवाय मंत्राचा जाप करावा. असे केल्याने आपला राग शांत होईल आणि मनामध्ये देखील पॉजिटिव विचार येतील.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने