हिंदू धर्मामध्ये रक्षाबंधन हा सण थाटामाटात साजरा केला जातो. रक्षाबंधन हा सण भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून ओळखला जातो. प्रत्येक वर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी हा सण साजरा केला जातो. यावर्षी रक्षाबंधनला अनेक शुभ संयोग बनत आहेत.

ज्योतिष शास्त्रानुसार हे संयोग खूपच शुभ मानले गेले आहेत. हे संयोग भाऊ-बहिणीसाठी खुच शुभ सिद्ध होतील. यावर्षी रक्षाबंधन २२ ऑगस्ट रविवारच्या दिवशी साजरा केला जाणार आहे. यावेळी भद्रकाल नसल्यामुळे दिवसभर कोणत्याही वेळी राखी बांधली जाऊ शकते.

रक्षाबंधन सण दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. जो यावेळी विशेष संयोगाने भरलेला आहे. यावेळी रक्षाबंधन सण अनेक कारणांमुळे अनोखा राहील. दुसरीकडे ३५ वर्षानंतर एक खास प्रकारचा संयोग या दिवशी बनत आहे.

यावेळी रक्षाबंधनवेळी कुंभ राशीमध्ये चंद्र आणि गुरु वक्री चालणार आहेत. या दोन्ही ग्रहांच्या या युतीमुळे यावेळी गजकेसरी योग बनत आहे. भद्रासारखा अशुभ काळ ज्यामध्ये राखी बांधली जात नाही ती वेळ सकाळी ६ वाजून १५ मिनिटांनी समाप्त होणार आहे.

धनिष्ठ आणि शोभन योग भाऊ-बहिण दोघांसाठी धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि पारिवारिक विधी करण्याचा सुअवसर आहे. अशा शुभ संयोगामध्ये दोघे अर्थात भाऊ आणि बहिण दोघांच्या भाग्यामध्ये वृद्धी होते. यावेळी पूर्ण दिवस भ्रद्रा राहणार नाही.

रक्षाबंधनला अति अशुभ मानला जाणारा भद्रा यावेळी दिवसभर राहणार नाही. यामुळे संध्याकाळी ४ वाजून ३० मिनिटांनी राहू काळ आरंभ होण्यापूर्वी दिवसभर रक्षाबंधन साजरा केला जाईल. यामुळे देखील दुपारी ११.५६ वाजल्यापासून ते १२.२० पर्यंत मुहुर्थ श्रेष्ठ राहील.

चांगल्या मुहूर्तावर किंवा भद्रविरहित काळात भावाच्या मनगटावर राखी बांधल्याने भावाला यश आणि विजय प्राप्ती होते. यादिवशी चंद्र मंगळच्या नक्षत्रामध्ये आणि कुंभ राशीमध्ये प्रवेश करेल. हा पर्व सर्व भाऊ बहिणींसाठी परम कल्याणकारी राहील. माथ्यावर तिलक केल्यानंतर आणि राखी बांधल्यानंतर मिठाई देखील खाऊ घालावी.

देवतांच्या रक्षणासाठी बांधलेल्या रक्षासूत्रची कथा: तसे तर श्रावण पौर्णिमेच्या दिवशी रक्षासुत्र बांधण्याची परंपरा वैदिक काळापासून चालत आली आहे. देवासुर लढाईमध्ये जेव्हा युध्द बराच काळ चालत असे आणि पुन्हा पुन्हा इंद्र युद्धामध्ये हारत होते तेव्हा इंद्राणी शचीने देवराजच्या मनगटावर रक्षासुत्र बांधला होता. या सुत्राला बांधून देवराज इंद्र जेव्हा युद्धाच्या मैदानामध्ये उतरले तेव्हा त्यांचे साहस आणि बळ अद्भूत दिसत होते. देवराज इंद्रने वृत्रासुराच्या व’ध केला आणि नंतर स्वर्गावर अधिकार केला.

शुभ काळ: २२ ऑगस्ट २०२१ रविवारी सकाळी ०६.१५ वाजल्यापासून संध्याकाळी ०५.१५ वाजेपर्यंत. रक्षाबंधनसाठी दुपारचा उत्तम काळ : ११.५६ वाजल्यापासून ०५.१० वाजेपर्यंत. पंचक आणि राहू काळ: २२ ऑगस्टच्या सकाळी ८ वाजल्यापासून पंचक देखील आरंभ होत आहे. ज्यामध्ये सामान्यतः शुभकार्य केले जात नाहीत, पण रक्षाबंधनमध्ये फक्त भद्राचाच विचार केला जातो. जो सकाळी ६ वाजून १७ मिनिटांनी समाप्त होईल. यादिवशी राहू काळ संध्याकाळी ५ वाजून १५ मिनिटांपर्यंत राहील.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने