एक चांगला जोडीदार मिळणे खूपच नशिबाची गोष्ट असते. तथापि अनेक वेळा महिलांची हि सवय असते कि त्या आपल्या पती किंवा प्रेमीबद्धल आपल्या मनामध्ये एखाद्या फिल्मी हिरोप्रमाणे भावना ठेवतात. पण असे जरुरी नाही कि जे चित्रपटांमध्ये होते ते खऱ्या आयुष्यामध्ये देखील होते.

प्रत्येकामध्ये कोणतीना कोणती कमी जरूर असते त्यामुळे अपेक्षा इतक्याच ठेवाव्यात कि त्या पूर्ण होतील. असे होऊ शकते कि तुमचा पती तुमच्यासाठी गिफ्ट आणत नसेल, रोमँटिक नसेल किंवा डिनरसाठी बाहेर नेत नसेल. पण जर तुमच्या पतीमध्ये हे गुण असतील तर तुमचा पती नशीबवान आहे.

प्रत्येक गोष्टीत समर्थन: जर तुमचा पती तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये समर्थन देत असेल. जर तुमच्या पतीला तुमच्या नुसार काम करण्यास कोणतीही समस्या नसेल तर तुम्ही खूपच लकी आहात. जर तुमचा प्रत्येक सल्ला तुमचा पती मानतो तर तुमचा पती सर्वात बेस्ट आहे.

अपशब्द वापरत नाही: पती-पत्नीमध्ये भांडणे सामान्य गोष्ट आहे. अनेक वेळा वादामध्ये एकमेकांवर अनेक आरोप लावले जातात. पण यासर्वांव्यतिरिक्त तुमचा पती तुमच्याप्रती किंवा तुमच्या कुटुंबाप्रती अभद्र भाषेचा प्रयोग करत नाही. तुमचा आदर करतो, तर समजून जा कि तुमचा प्रती तुमच्याप्रती प्रामाणिक आहे.

नात्याला प्राधान्य: आजच्या काळामध्ये प्रत्येकाची प्राथमिकता स्वतःच असते. पण जर तुमचा पती तुमच्यासोबत कोणत्याही मोठ्या भांडणानंतर तुमच्यासोबत नात्याला प्राधान्य देतो तेव्हा तुम्ही खूपच भाग्यशाली आहात.

प्रत्येक गोष्ट उघडपणे व्यक्त करणे: जर तुमचा पती तुमच्यासोबत कोणतीही गोष्ट बोलण्यास संकोच करत नाही. मग ती गोष्ट कितीही गंभीर असो किंवा कितीही छोटी असो. तुमचा पती तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगतो आणि त्याचबरोबर तुमची प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याचा प्रयत्न करतो तर हे याचे संकेत आहेत कि तुमचा पती तुमच्यासोबत खुश आहे.

आपल्या अपेक्षा व्यक्त करणे: नात्यामध्ये प्रत्येकाला कोणत्याना कोणत्या अपेक्षा असतात. अशामध्ये लोक आपल्या अपेक्षा आपल्या जोडीदारापासून लपवतात. ज्यामुळे नात्यामध्ये प्रेम संपुष्टात येऊ लागते. पण जर तुमचा पती तुमच्यासोबत उघडपणे बोलतो. तुम्हाला सांगतो कि त्याला काय समस्या आहेत आणि त्याच्या काय अपेक्षा आहेत. हे तुमच्यासाठी खूपच चांगले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने