व्यक्तीची मेहनत तेव्हाच सफल होते जेव्हा त्याच्यावर धनसंपत्तीची देवी लक्ष्मी मेहरबान होते. असे म्हंटले जाते कि ज्या व्यक्तीवर धनसंपत्तीची देवी लक्ष्मीची कृपा दृष्टी राहते, त्या व्यक्तीला आपल्या जीवनामध्ये सफलता मिळते. व्यक्तीला कमी मेहनतीमध्ये अधिक लाभ मिळतो. पण ज्या व्यक्तींवर लक्ष्मी नाराज होते त्यांना आपल्या जीवनामध्ये निराशेचा सामना करावा लागतो. व्यक्तीने कितीही प्रयत्न केला तरी त्याला सफलता मिळत नाही.

अशी अनेक कारणे आहेत ज्यामुळे माता लक्ष्मी नाराज होते. वास्तू शास्त्रामध्ये अशा अनेक गोष्टींचा उल्लेख केला गेला आहे. ज्यामुळे आपल्याला समस्यांचा सामना करावा लागतो आणि आपल्या जीवनामध्ये धनाची कमी नेहमी बनून राहते. वास्तू शास्त्रानुसार झाडूचे देखील नियम सांगितले गेले आहेत. झाडू ठेवण्याची दिशा आणि झाडू मारण्याची योग्य वेळ याचा देखील उल्लेख केला गेला आहे.

वास्तू शास्त्रानुसार झाडू योग्यरित्या मारला तर किंवा झाडू योग्य दिशेला ठेवला तर यामुळे आपल्या जीवनामधील धनाची कमी दूर होते आणि आपण धन संचय करण्यात सफल होतो. जर वास्तू शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे नियमांचे पालन केले तर आपण खूप लवकर मालामाल देखील होऊ शकतो. वास्तू शास्त्राप्रमाणे आपल्या शास्त्रामध्ये देखील झाडूच्या वापराबद्दल सांगितले गेले आहे.

असे सांगितले जाते कि जर झाडू योग्य मुहूर्तावर खरेदी करून घरामध्ये आणला तर यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा निवास होतो. याशिवाय झाडूने कोणत्याही प्राण्याला मारू नये, हे योग्य मानले जात नाही. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आज आपण वास्तू शास्त्रानुसार झाडू संबंधी काही नियम जाणून घेणार आहोत. जर आपण या नियामचे पालन केले तर यामुळे आपल्या जीवनामध्ये खुशहाली बनून राहील.

लपवून ठेवा झाडू: वास्तू शास्त्रानुसार आपल्या घरामध्ये झाडू नेहमी अशा स्थानी ठेवावा जिथे इतर कोणत्याची व्यक्तीची नजर त्यावर पडू नये. याशिवाय आपल्या घरामध्ये झाडू नेहमी अडवाच ठेवावा, झाडू कधीच उभा करून ठेऊ नये हे अशुभ मानले जाते.

रात्रीच्या वेळी घराच्या बाहेर ठेवा: जर तुम्ही रात्रीच्या वेळी घराच्या बाहेर किंवा मुख्य द्वाराजवळ झाडू ठेवत असाल तर याला शुभ मानले गेले आहे. असे म्हंटले जाते कि रात्रीच्या वेळी जर झाडू अशा स्थानी ठेवला तर घरामध्ये नकारात्मक उर्जेचा प्रवेश होत नाही पण हि गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे कि रात्रीच्या वेळी झाडू बाहेर ठेवावा आणि दिवसा याला लपवून ठेवावे.

या दिशेला ठेवा झाडू: आपल्या घरामध्ये झाडू नेहमी दक्षिण दिशेला ठेवावा. हि दिशा सर्वात उत्तम मानली जाते. याशिवाय घराच्या छतावर झाडू कधीच ठेऊ नये. जर असे केले तर यामुळे आपल्या जीवनामध्ये नेहमी पैशांसंबंधी समस्या निर्माण होतील.

रात्रीच्या वेळी झाडू मारू नये: वास्तू शास्त्रानुसार चुकूनहि रात्रीच्या वेळी झाडू मारू नये कारण यामुळे आपल्या जीवनामध्ये वाईट घडण्याची संभावना होते. झाडू मारण्याची योग्य वेळ सकाळ आणि दिवस मानला गेला आहे. संध्याकाळी ५ वाजल्यानंतर झाडूचा वापर करू नये.

झाडूवर पाय ठेऊ नये: या गोष्टीची विशेष काळजी घेतली पाहिजे कि कधीही झाडूवर पाय ठेऊ नये किंवा लाथ मारू नये. कारण वास्तू शास्त्रानुसार जर झाडूला पायाने स्पर्श केला तर यामुळे धन संपत्तीची देवी माता लक्ष्मी नाराज होते. ज्यामुळे आपल्याला अनेक गोष्टींचा सामना करावा लागू शकतो. याशिवाय झाडूला ओलांडू देखील नये.

झाडू खरेदी करण्याचा योग्य मुहूर्त: दिवाळीच्या वेळी झाडू खरेदी करणे अत्यंत शुभ मानले गेले आहे. असे म्हंटले जाते कि तर दिवाळीच्या वेळी झाडू घरी आणला तर यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा प्रवेश होतो आणि आपल्या जीवनामध्ये धनाची समस्या कधीच होत नाही. झाडू जर शुभ वेळी खरेदी केला तर यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी येते.

शास्त्रानुसार झाडू कृष्ण पक्ष वेळी खरेदी करणे उत्तम मानले गेले आहे. जर यावेळी आपण झाडू खरेदी करून आपल्या घरामध्ये आणल्यास यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक उर्जेचा प्रवेश होतो. पण शुक्लपक्ष दरम्यान झाडू खरेदी करून घरामध्ये कधीच आणू नये यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक उर्जेचा प्रवेश होतो.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने