ऑस्ट्रेलियाचा स्फोटक अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल लवकरच भारताचा जावई होणार आहे. त्याने गेल्या वर्षी त्याची भारतीय गर्लफ्रेंड विनी रमणसोबत एंगेजमेंट केली होती. हि एंगेजमेंट भारतीय रीतिरिवाजानुसार झाली होती.

ग्लेन मॅक्सवेल आणि विनी रमण यांच्या एंगेजमेंटमध्ये त्यांचे फक्त जवळचे मित्र आणि कुटुंबीय उपस्थित होते. या दरम्यान ग्लेन मॅक्सवेलने निळ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती. तर त्याची गर्लफ्रेंड विनीने ब्लॅक कलरचा लेहंगा आणि चुनरी घेतली होती. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.

ग्लेन मॅक्सवेल आणि विनी लवकरच लग्न करणार आहेत. यानंतर ग्लेन मॅक्सवेल भारताचा जावई बनेल. ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू शॉन टेटनेही भारतीय वंशाच्या मुलीसोबत लग्न केले आहे. २०१४ मध्ये शॉन टेटने आपली भारतीय गर्लफ्रेंड मासूम सिंघा सोबत लग्न केले होते. दोघांची भेट आईपीएल पार्टी दरम्यान झाली होती. लग्नापूर्वी दोघेही बराच काळ रिलेशनशिपमध्ये राहिले होते.

ग्लेन मॅक्सवेलने मानसिक आरोग्यामुळे ऑक्टोबर २०१९ मध्ये क्रिकेटमधून ब्रेक घेतला. या बातमीमुळे त्याच्या चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला होता. ज्यानंतर असा अंदाज लावला जात होता कि तो आपल्या रिलेशनशिपमुळे मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आहे. पण असे काही नव्हते.

मॅक्सवेलने हे स्पष्ट केले होते कि तो विनी रमणमुळेच पुन्हा क्रिकेटमध्ये परतला आहे. मॅक्सवेलने हे देखील सांगितले कि सर्वात पहिला त्याच्या गर्लफ्रेंडलाच त्याच्यामध्ये बदल जाणवला होता. तिनेच मला कोणाशीतरी सल्लामसलत करायला सांगितले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने