आपल्या लग्नामध्ये विशेष काही करण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. पण जरा विचार करा कि आपल्या लग्नाच्या दिवशी एंट्रीला जर चुकीचे गाणे लावले तर काय होईल? साहजिकच आपला सगळा मूड खराब होईल आणि चांगलाच राग येईल. असेच काही एका नवरीसोबत झाले आहे. जेव्हा तिच्या एंट्रीला चुकीचे गाणे वाजवले गेले तेव्हा तिला खूप राग आला. सध्या हा व्हिडीओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

एका फॅन पेजवरून शेयर करण्यात आलेला हा नवरीचा व्हिडीओ सध्या खूपच चर्चेचा विषय बनला आहे. व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे कि नवरी आपल्या एंट्रीवर चुकीचे गाणे वाजल्यामुळे खूप रागावली आहे. वास्तविक काळजीपूर्वक ऐकल्यावर असे समजते कि नवरी जेव्हा एंट्री करते तेव्हा बॅकग्राउंडला ‘दो घूंट मुझे भी पिला दे शराबी’ गाणे चालू आहे. जे ऐकल्यानंतर तिला खूप राग येतो आणि ती नाराज होते. नवरीला राग आल्यानंतर ‘दिन शगन दा’ गाणे लावले जाते.

व्हिडीओमध्ये तुम्ही स्पष्टपणे बघू शकता नवरी म्हणत आहे कि मी अशी तर एंट्री बिलकुल देखील करणार नाही, त्याला सांगा मी त्याला बोलले होते. सोशल मिडियावर देखील या व्हिडीओवर चांगल्याच कमेंट येत आहेत. एकाने लिहिले आहे कि अरे हि तर पप्पाची परी आहे. तर एका दुसऱ्या युजरने लिहिले आहे कि डीजे वाले बाबू नवरीचे गाणे लाव. तर काही लोक हे लिहिताना देखील दिसत आहे कि तिचा दिवस आहे यामुळे गाणे वाजले पाहिजे.

पहा व्हिडीओ:

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने