भारत हा असा देश आहे जिथे अनेक प्रथा परंपरा पूर्वीच्या काळापासून चालत आलेल्या आहेत. ज्यामध्ये अनेक प्रथा अशा आहेत ज्या जाणून घेतल्यानंतर हैराणी होते. काही प्रथा इतक्या विचित्र असतात तरीही त्या पूर्वीपासून चालत आलेल्या आहेत. आज आपण अशाच एक प्रथेबद्दल जाऊन घेणार आहोत.

राजस्थानमध्ये भारत-पाकिस्तान बॉर्डरजवळ बाडमेर नावाचा एक छोटा जिल्हा आहे. ज्यामध्ये देरासर नावाचे एक लहान गाव आहे. बॉर्डरवर वसलेल्या या छोट्या गावाची लोकसंख्या जवळ जवळ ६०० पेक्षा जास्त नसेल. या गावाबद्दल एक आश्चर्यजनक गोष्ट हि आहे कि या गावामधील प्रत्येक पुरुष चक्क दोन वेळा वेगवेगळ्या महिलांसोबत लग्न करतो. हा विवाह त्यांच्या मर्जीने नाही तर त्यांच्या पूर्वीपासून चालत आलेल्या परंपरेमुळे केला जातो.

राजस्थानच्या या गावामध्ये एकापेक्षा जास्त लग्न करणे हा एक छंद नाही तर त्यांना हे नाईलाजाने करावे लागते. या गावामध्ये हि प्रथा आहे ज्यामुळे प्रत्येक पुरुषाला इच्छा नसताना देखील दोनवेळा लग्न करावे लागते.

या प्रथेमागे एक कारण हे आहे कि जुन्या काळामध्ये जेव्हा कोणताही पुरुष विवाह करत असे तेव्हा त्याला आपल्या पहिल्या पत्नीपासून सुखप्राप्ती होत नसे. यामुळे त्याला दुसरा विवाह करावा लागत असे. हळू हळू हि प्रक्रिया प्रथेमध्ये बदलली. तथापि या गावामधील प्रत्येक पुरुषाला दोनवेळा विवाह बंधनामध्ये अडकावे लागते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने