देशामध्ये बोलपट चित्रपटांचा काळ सुरु होऊन ९ दशके उलटली होती. इतक्या मोठ्या कालावधीमध्ये चित्रपट जगतामध्ये अनेक बदल झाले. अशाच परिवर्तनामध्ये चित्रपटामध्ये महिलांचा उपस्थितीमध्ये देखील मोठे बदल झाले. सुरुवातीला महिलांनी चित्रपटामध्ये काम करणे चांगले मानले जात नव्हते.

परंतु कालांतराने परिस्थिती बदलली आणि महिला देखील चित्रपटामध्ये काम करू लागल्या. भारतीय चित्रपटामध्ये महिलांना आणण्याचे श्रेय एका स्त्रीला जाते ती म्हणजे देविका राणी. आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी आणि पहिल्यांदा स्क्रीनवर की*स*सा*ठी प्रसिद्ध देविका राणीला फर्स्ट लेडी ऑफ़ इंडियन सिनेमा देखील म्हंटले जाते.

देविका राणीचा जन्म ३० मार्च १९०८ रोजी मद्रास मध्ये झाला होता. १९३० च्या दशकामध्ये तिने फिल्म इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवले. हा तो काळ होता जेव्हा चित्रपटामध्ये महिलांनी काम करणे इतके सोपे नव्हते, पण देविका राणीने याची बिलकुल पर्वा केली नाही.

त्या काळामध्ये मोठ्या पडद्यावर रो*मां*स सी*न दाखवण्याबद्दल विचार देखील केला जात नव्हता. ९० च्या दशकामध्ये देखील रो*मां*स झाडाच्या मागे किंवा फुलाच्या मागे दाखवला जात होता. यावरून आपण अंदाज लावू शकतो कि ३० आणि ४० दशकामध्ये परिस्थिती कशी असेल.

तथापि आता हि परिस्थिती कोणालातर बदलायची होती. अशामध्ये चित्रपटामध्ये ट्रेंड सेट करण्यास आलेल्या देविका राणीने याची सुरुवात केली. तिने १९३३ मध्ये आलेल्या कर्मामध्ये हिमांशु रायसोबत कि*सिं*ग सी*न दिला होता. हा कि*सिं*ग सी*न पूर्ण ४ मिनिट लांब होता. अशामध्ये हे साहजिकच होते कि याला विरोध केला गेला.

देविका राणीचे करियर १० वर्षे चालले. आपल्या या करियरमध्ये तिने अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम केले. तिने सुपरस्टार अशोक कुमारसोबत जीवन नैया, अछूत कन्या आणि जन्मभूमि सारख्या चित्रपटामध्ये काम केले. ती पहिली महिला अभिनेत्री होती जिला दादा साहेब फाळके पुरस्कार मिळाला. तिला पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. १९९४ मध्ये ९ मार्चला ८५ व्या वर्षी तिने शेवटचा श्वास घेतला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने