बॉलीवूड कलाकार आपल्या अभिनय आणि उत्कृष्ठ चित्रपटांशिवाय आपल्या अलिशान लाईफबद्दल देखील ओळखले जातात. परदेशामध्ये सुट्ट्या, अलिशान घर, महागड्या गाड्या याशिवाय हे टॉप कलाकार आपल्या सुरक्षेसाठी हाय सिक्यूरिटी देखील ठेवतात. या पर्सनल बॉडीगार्ड्सला हे कलाकार लाखो, करोडो रुपये पगारही देतात.

सलमान खान शाहरुख खान, दीपिका पादुकोण शिवाय बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन देखील आपल्या पर्सनल बॉडीगार्डला चांगला पगार देतात. बिग बीला अनेक प्रसंगी आपला पर्सनल बॉडीगार्ड जितेंद्र शिंदेसोबत पाहिले गेले आहे.

जितेंद्र शिंदे अनेक पब्लिक इवेंटमध्ये त्यांना सुरक्षा देताना दिसला आहे. आता एका न्यूजपेपरच्या अहवालानुसार अशी माहिती समोर आली आहे कि अमिताभ बच्चनचा पर्सनल बॉडीगार्ड जीतेंद्र शिंदेची वार्षिक कमाई १.५ करोड इतकी आहे म्हणजे तो महिन्याला ११ लाख रुपये कमवतो.

तसे जितेंद्र शिंदे स्वतःची एक सिक्यूरिटी एजन्सी चालवतो. त्याची कंपनी अनेक कलाकारांना सुरक्षा देण्याचे काम करते. पण तो स्वतः अमिताभ बच्चनसाठी काम करतो. त्यांना प्रोटेक्ट करतो. अमिताभ बच्चन आपल्या बॉडीगार्डला चांगला पगार देण्याव्यतिरिक्त चेहरे चित्रपटासाठी देखील सध्या चर्चेमध्ये आहेत.

या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन पहिल्यांदाच इमरान हाशमीसोबत स्क्रीन शेयर करणार आहेत. या चित्रपटामध्ये रिया चक्रवर्ती, क्रिस्टल डिसूजा सारखे कलाकार देखील पाहायला मिळणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन रूमी जाफरीने केले आहे जो २७ ऑगस्टला प्रदर्शित करण्यात आला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने