जमशेदपुरमध्ये रस्त्याच्या कडेला आंबे विकत असलेल्या एका मुलीचे नशीबच पालटले, जेव्हा तिच्याकडून १२ आंबे चक्क १ लाख २० हजार रुपेयांमध्ये खरेदी केले गेले. लॉकडाऊनमुळे या ११ वर्षाची तुलसीला आंबे विकावे लागले होते, ऑनलाइन क्लाससाठी तिच्याकडे फोन नसल्यामुळे तिला असे करावे लागले.

पाचवीमध्ये शिकत असलेली तुलसी गेल्या काही दिवसांपासून कीनन स्टेडियमजवळ आंबे विकत होती, पण नंतर असे काही झाले कि तिची स्वप्ने काही क्षणांमध्येच पूर्ण झाली. तिचे संपूर्ण नशीबच पालटून गेले.

सव्वा लाखामध्ये विकले गेले आंबे: तुलसीचा आंबे विकतानाचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाला होता. ती व्हिडीओमध्ये आंबे विकताना पाहायला मिळत होती. व्हायरल होत होत हा व्हिडीओ एका मदत करणाऱ्यापर्यंत पोहोचला.

ज्यामुळे तुलसीला मदत मिळण्यास जास्त वेळ लागला नाही. मुंबईची एक कंपनी व्हॅल्यूएबल एड्युटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडने तुलसीला एक डझन आंब्यासाठी चक्क सव्वा लाख रुपये देऊ केले, ज्यामुळे तिचे नशीबच पालटून गेले.

कोण आहे मदत करणारा: मुंबई स्थित व्हॅल्यूएबल एड्युटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अमेया हेटे यांनी तुलसीला मदत केली आहे. त्यांना सोशल मिडियाद्वारे याबद्दल सर्व माहिती मिळाली आणि त्यांनी १०००० रुपये प्रती आंबा देऊ करून १२ आंबे सव्वा लाखाला खरेदी केले. आंबे खरेदी केल्यानंतर संपूर्ण पैसे तुलसीच्या वडिलांच्या बँक खात्यामध्ये ट्रांसफर देखील केले.

तुलसीला लिहिले पत्र: अमेया हेटेने तुलसीला एक पत्र देखील लिहिले कि, तुझी चिकाटी आणि संघर्ष सोशल मिडियाद्वारे समोर आली आणि वर्षा जहांगीरदारद्वारे मला त्याची माहिती मिळाली. तुझ्यासारखे अनेक विद्यार्थी आहेत जे ऑनलाइन शिक्षणापासून वंचित आहेत.

मी वास्तवामध्ये यामुळे खूप प्रभावित झालो कि तू हार मानली नाहीस आणि त्यास सामोरे जाऊन संघर्ष केलास. तू सिद्ध केलेस कि जिथे इच्छा असते तिथे मार्ग निघतोच. तू इच्छा दाखवली आहेस आणि आम्ही मार्ग शोधण्यास तुझी मदत करत आहोत.

खूपच खुश आहे तुलसी: आंबे विकून मिळालेल्या पैशांमुळे खूपच खुश आहे तुलसी. तिने सांगितले कि ती फोन खरेदी करण्यासाठी पैसे जमवत होती. तिला आपले ऑनलाइन शिक्षण चालू ठेवण्याची इच्छा होती. या पैशांमधून तिने एक फोन खरेदी केला आहे आणि उर्वरित पैसे तिने पुढील अभ्यासासाठी ठेवले आहेत.

तुलसीने सांगितले कि लॉकडाउनमुळे तिच्या वडिलांची नोकरी गेली आता ती स्वतःच तर शिकणार आहेच त्याचबरोबर ती आपल्या दोन बहिणी रोशनी आणि दीपिकाला देखील शिकवणार आहे. तिला मोठे होऊन शिक्षिका व्हायचे आहे. जेणेकरून ती सर्वांना शिकवू शकेल.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने