अनियमित जीवनशैलीमुळे जगभरामध्ये बहुतेक लोक शारीरिक समस्यांनी त्रस्त आहेत. पण पाकिस्तान येथील हुंजा खोऱ्यामध्ये अशा समस्या पाहायला मिळत नाहीत. हुंजा खोऱ्यामध्ये हुंजा समुदायाचे लोक शारीरिक रूपाने खूपच मजबूत असतात आणि त्यांना कदाचित दवाखान्यामध्ये जाण्याची गरज भासत नाही.

सर्वात हैराण करणारी गोष्ट हि आहे कि या समुदायामधील लोकांचा जीवनकाळ जवळ जवळ १५० वर्षे इतका मानला जातो. या समुदायाच्या विविध चाली-रितीवर अनेक पुस्तके देखील लिहिली गेली आहेत ज्यामधून आपल्याला त्यांच्याबद्दल बरीच माहिती मिळते.

या समुदायामधील महिला ६० ते ९० व्या वर्षी देखील कोणत्याही समस्येविना ग*र्भ*व*ती होऊ शकतात. इतकेच नाही तर या खास समुदायामधील महिला जगातील सर्वात सुंदर महिला म्हणून देखील ओळखल्या जातात. हुंजा समुदायाच्या लोकांना बुरुशो देखील म्हंटले जाते. हे लोक बुरुशास्की भाषा बोलतात.

असे म्हंटले जाते कि हुंजा समुदायाचे लोक इतर अन्य समुदायाच्या लोकांपेक्षा अधिक शिक्षित आहेत. हुंजा खोऱ्यामध्ये यांची संख्या ८५ हजार पेक्षा जास्त आहे. हुंजा खोरे प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक आहे. जगभरामधून अनेक लोक येथे भेट देतात.

हुंजा समुदायाच्या लोकांची जीवनशैली त्यांच्या दीर्घायुष्याचे रहस्य आहे. हे लोक सकाळी पाच वाजता उठतात. येथील लोक सायकल किंवा गाडीचा वापर खूपच कमी प्रमाणत करतात आणि जास्त करून पायीच चालतात.

हे जास्त करून बाजरी, कुट्टू आणि गव्हाचे पीठ खातात ज्यामुळे हे लोक शारीरक रूपाने मजबूत राहतात. असे म्हंटले जाते कि हे लोक मांसाचे सेवन खूपच कमी प्रमाणत करतात. एखाद्या खास प्रसंगी हे लोक मांस खातात, पण त्यामध्ये देखील याचे प्रमाण खूपच कमी असते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने