आपला भारत देश विविध परंपरांनी भरलेला आहे. इथे अनेक परंपरा आणि मान्यता अशा आहेत ज्या जाणून घेतल्यानंतर तुम्ही देखील हैराण व्हाल आणि गोष्ट लग्नाच्या रितीरिवाजाची असेल तर प्रत्येक धर्मामध्ये वेगवेगळ्या मान्यता आणि रिवाज आहेत. भारतामध्ये लग्नाबद्दल अनेक प्रकारचे रितीरिवाज आहेत. पण आज आपण अशा रितीरिवाजांबद्दल जाणून घेणार आहोत जे जाणून घेतल्यानंतर तुम्ही हैराण व्हाल.

पश्चिम आफ्रिकेमध्ये वोदाब्बे जमात आहे. जिथे लग्न करण्यासाठी दुसऱ्याच्या पत्नीची चोरी करावी लागते. इथल्या प्रथेमुळे लोक एकमेकांच्या पत्नीची चोरी करून लग्न करतात. या जमातीचे लोक एकमेकांची पत्नी चोरून लग्न करतात.

अशाप्रकारचे लग्न या जमातीची विशेष ओळख आहे. या जमातीच्या लोकांमध्ये एकमेकांची पत्नी चोरण्याची विचित्र परंपरा आहे. या जमातीचे लोक पहिले आपल्या कुटुंबियांच्या मर्जीने करतात पण दुसरे लग्न करण्याचा रिवाज थोडा हटके आहे. या जमातीमध्ये दुसऱ्या लग्नासाठी एखाद्याची पत्नी चोरणे जरुरीचे आहे. जर असे केले नाही तर दुसरे लग्न करण्याचा अधिकार मिळत नाही.

या जमातीच्या लोकांमध्ये प्रत्येक वर्षी गेरेवोल फेस्टिवलचे आयोजन केले जाते. या आयोजना दरम्यान मुले सजून-धजून आपल्या चेहऱ्याला रंग लावतात. यानंतर सामुहिक आयोजनामध्ये डांस आणि विविध क्रियाकलाप करून दुसऱ्यांच्या पत्नीला इंप्रेस करण्याचा प्रयत्न करतात.

पण या दरम्यान याची काळजी घ्यावी लागते कि तिच्या पतीला याची माहिती होऊ द्यायची नाही. यानंतर जर एखादी महिला दुसऱ्या पुरुषासोबत पळून जाते तर त्या समुदायाचे लोक दोघांना शोधून त्यांचे लग्न लावून दिले जाते. या लग्नाला लव्ह मॅरेज म्हणून स्वीकारले जाते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने