हस्तरेखाशास्त्रामध्ये हाताच्या बोटांबद्दल बरेच काही सांगितले गेले आहे. आपल्याला माहिती आहे का आपल्या हाताचे बोट आपल्याबद्दल अशा काही गोष्टी सांगते जे जाणून घेतल्यास तुम्ही देखील आश्चर्यचकित व्हाल.

शास्त्रानुसार हे आपल्या व्यक्तित्व आणि बुद्धीसोबत धन आणि करियरबद्दल अनेक गोष्टी सांगते. असे देखील मानले गेले आहे कि एखाद्या व्यक्तीचा हातच नाही तर बोट देखील त्याच्या येणाऱ्या भविष्याबद्दल बरेच काही सांगू शकते.

ज्योतिषशास्त्रानुसार हाताचे लहान बोट ज्याला आपण करंगळी म्हणतो व्यक्तीच्या जीवनाबद्दल बरेच काही सांगते. लहान बोटाची बनावट आणि लांबी सांगते कि व्यक्तीचा स्वभाव कसा आहे आणि तो आपल्या आयुष्य कशाप्रकारे जगणे पसंत करतो चला तर जाणून घेऊया हाताच्या लहान बोटाबद्दल.

ज्या लोकांच्या हाताचे लहान बोट अनामिका बोटापासून दूर असते असे लोक आपले आयुष्य मुक्तपणे जगणे पसंत करतात. आपल्या हाताच्या लहान बोटाला इंग्लिशमध्ये फिंगर ऑफ मरकरी किंवा लिटिल फिंगर असे देखील म्हणतात.

ज्या लोकांच्या हाताचे छोटे बोट लांब आणि दिसायला सुंदर असते असे लोक सहजपणे दुसऱ्यांना प्रभावित करू शकतात. जर एखाद्या व्यक्तीच्या हाताचे बोट टोकदार असेल तर असे लोक बुद्धीने खूपच तल्लख असतात. हे लोक जे देखील काम करतात ते खूपच विचारपूर्वक करतात.

ज्या लोकांच्या हाताचे लहान बोट जास्त लांब असते असे लोक प्रत्येक काम करण्यास खूपच घाईगडबड करतात. असे लोक स्वभावाने समजदार नसतात. असे लोक कोणताहि विचार न करता पुढचे काम करण्यास घेतात. ज्या व्यक्तीच्या हातामध्ये भद्र योग बनतो असे लोक तल्लख बुद्धीचे असतात.

काही लोकांच्या हाताचे बोट अनामिका बोटाच्या बरोबर असते असे लोक राजकारणामध्ये जास्त रुची ठेवतात. तुम्ही देखील हाताच्या बोटाच्या बनावटी वरून आपले भाग्य जाणून घेऊ शकता. हाताच्या रेषांसोबत बोटे देखील आपले भागीष्य सांगतात.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने